Join us  

Tanushree Dutta Controversy: तनुश्री दत्ताच्या तक्रारीकडे लक्ष दिले गेले नाही...; CINTAAने दिली चुकीची कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 10:50 AM

Tanushree Dutta controversy: सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (सीआयएनटीएए) तनुश्री दत्ता-नाना पाटेकर प्रकरणी एक स्टेटमेंट जारी करत, तनुश्रीच्या तक्रार योग्यरित्या हाताळली गेली नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादावरून बॉलिवूड दोन गटांत विभागले गेले असताना, आता सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (सीआयएनटीएए) याप्रकरणी एक स्टेटमेंट जारी करत, तनुश्रीच्या तक्रार योग्यरित्या हाताळली गेली नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.‘सीआयएनटीएएने कुठल्याही व्यक्तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्या कृत्याची कायम निंदा केली आहे. लैंगिक शोषण कुठल्याही रूपात अस्वीकार्य आहे. सन २००८ मध्ये सीआयएनटीएएच्या कार्यकारी समितीसमक्ष तनुश्री दत्ताने दाखल केलेल्या तक्रारीबद्दल कळले. सीआयएनटीएएच्या संयुक्त विवाद निपटारा समिती आणि जॉर्इंट फिल्म अ‍ॅण्ड टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिलने जुलै २००८ मध्ये दिलेला निर्णय योग्य नव्हता. त्या तक्रारीकडे तितक्या गंभीरपणे पाहिले गेले नाही’ असे सीआयएनटीएएने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

अर्थात आपल्या घटनेचा हवाला देत, तनुश्रीच्या तक्रारीवर आता काहीही करता येणार नसल्याचेही सीआयएनटीएएने स्पष्ट केले आहे.

‘त्यावेळी वेगळी कार्यकारी समिती होती आणि सीआयएनटीएएच्या मते, झाले ते खेदजनक होते. यासाठी माफी पुरेशी नाही. त्यामुळे अशी चूक भविष्यात होता कामा नये, असा संकल्प आम्ही केला आहे. सीआयएनटीएए आपल्या सदस्यांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. लैंगिक शोषण एक गंभीर गुन्हा आहे. पण दुर्दैवाने सीआयएनटीएएची घटना तीन वर्षे जुने प्रकरण नव्याने उघड करण्याची परवानगी देत नाही,’ असेही सीआयएनटीएएने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटींगवेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते आणि यानंतर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला धमकावले होते,असा तनुश्रीचा आरोप आहे.

टॅग्स :तनुश्री दत्तानाना पाटेकर