Join us

Arun Verma Death : अभिनेते अरूण वर्मा यांचे निधन, ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 7:23 PM

बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा (Arun Verma) यांचे आज सकाळी निधन झाले आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.

बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा (Arun Verma) यांचे निधन झाले आहे. ते ६२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यांच्यावर पीपल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी अभिनेत्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अरुण वर्मा यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. मात्र त्यांचे फुफ्फुस निकामी झाले होते. हळूहळू त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे कमी केले होते आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता आणि कॉमेडियन उदय दहिया यांनी लिहिले की 'मला हे सांगताना अत्यंत दुःख होतंय की माझे मित्र अभिनेते अरुण वर्मा यांचे आज सकाळी भोपाळ येथे निधन झाले आहे. ओम शांती'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवंगत अभिनेते अरुण वर्मा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. डकैत या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.  यानंतर त्यांनी 'हिना', ‘खलनायक’, ‘प्रेम ग्रंथ’, ‘नायक’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘हिरोपंती’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ६ महिन्यांपूर्वी अरुण वर्मा यांनी कंगना रणौत निर्मित 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटासाठी भोपाळमध्ये नवाजुद्दीनसोबत शूटिंग केले होते. चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी मालिकेतदेखील काम केले आहे.