cruise drugs case: २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB)एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला. या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानचादेखील (aryan khan) समावेश होता. सध्या आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये (arthur road jail) ठेवण्यात आलं आहे. आर्यनला जामीन मिळावा यासाठी आर्यनच्या वकिलांनी मुंबईच्या किला कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे शुक्रवारची त्रास आर्यनला तुरुंगातच काढावी लागली. दरम्यान, तुरुंगात आर्यनला अन्य कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळत असून त्याला कोणतीही विशेष ट्रिटमेंट देण्यात येत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच आर्यनला सध्या कोणत्या बॅरेकमध्ये ठेवलंय हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. (aryan khan in arthur road jail)
ड्रग्स प्रकरणात आर्यनचं नाव आल्यानंतर त्याला ऑर्थर रोड जेलमध्ये एक काढावी लागली आहे. यावेळी त्याला अन्य कैद्यांप्रमाणेच साधं जेवण, आणि अंथरुण-पांघरुण शेअर करावं लागलं.
Aryan Khan Arrest News: अक्षय कुमारचा मुलगादेखील होता क्रुझ ड्रग्स पार्टीत?
कुठं ठेवलंय आर्यनला?
आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट या दोघांनाही आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आलं आहे. या दोघांचीही RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना स्पेशल क्वारंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आर्यन आणि अरबाजला ठेवण्यात आलेल्या बॅरेक क्रमांक १मध्ये केवळ एकच पंखा असून या दोघांनाही एकच अंथरुण-पांघरुण देण्यात आलं आहे. सोबतच अन्य कैद्यांप्रमाणे रोजच्या जेवणात त्यांना वरण-भात, भाजी-पोळी हेच पदार्थ देण्यात येतात.
Aryan Khan Arrest updates: ...तर किंग खानच्या मुलाला १० वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा?
दरम्यान, सत्र न्यायालय बंद असल्यामुळे आर्यनचा जामीन अर्ज दाखल करता आलेला नाही. त्यामुळे जामिनाची पुढील प्रक्रिया न्यायालय सुरु झाल्यानंतरच होईल. तोपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आर्यनला तुरुंगात रहावं लागणार आहे.