Join us  

Aryan Khan Buys Flat: आर्यन खानने दिल्लीत खरेदी केला फ्लॅट, शाहरुख अन् गौरी साठी का आहे एवढा खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:00 PM

आर्यन खानने दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये दोन फ्लॅट्सची डील केली आहे. याची किंमतच...

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा लाडका आर्यन खान (Aryan Khan) सर्वात चर्चेतला स्टारकीड आहे. आधी ड्रग्स प्रकरणात त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. आता आर्यनने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 'स्टारडम' या वेबसीरिजचं तो दिग्दर्शन करतोय. दरम्यान आर्यनने नुकताच दिल्लीत कोट्यवधी रुपयांना दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. तसंच हा फ्लॅट शाहरुख खानसाठी खूपच खास आहे. 

आर्यन खाननेदिल्लीतील पंचशील पार्कमध्ये दोन फ्लॅट्सची डील केली आहे. 37 कोटी त्याने हे दोन फ्लॅट घेतले. दोन मजल्यांवर हा एक एक फ्लॅट आहे. दिल्लीच्या पॉश भागात त्याने हे लक्झरी फ्लॅट घेतल्याने त्याचीच चर्चा होत आहे. यासाठी त्याने 2.64 कोटी स्टॅम्प ड्युटीही भरली. विशेष म्हणजे ज्या अपार्टमेंटमध्ये आर्यनने हे फ्लॅट घेतले तेथील ग्राऊंड फ्लोर आणि पहिल्या मजल्यावरील अपार्टमेंट हे आधीपासूनच गौरी आणि शाहरुखच्या नावावर आहे. सुरुवातीच्या काळात शाहरुख आणि गौरी दिल्लीतील याच फ्लॅटमध्ये राहत होते. आता आर्यननेही त्याच इमारतीत दोन मजले खरेदी केले. गौरी खान या दोन्ही फ्लॅट्सचं इंटेरियर करणार आहे. 

आर्यन खानने युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया मधून शिक्षण पूर्ण केले. तिथून परत आल्यानंतर त्याने काही सिनेमांमध्ये डबिंगही केले. 2022 मध्ये आर्यनने D'yavol हा लग्झरी फॅशन ब्रँड लाँच केला. खुद्द शाहरुख खान या ब्रँडचा अँबॅसिडर आहे. याशिवाय त्याने वोडका ब्रँडही सुरु केला. मीडिया रिपोर्टनुसार आर्यनची एकूण संपत्ती 80 कोटी एवढी आहे. तर आता आर्यन दिग्दर्शक म्हणूनही समोर येत आहे. 

टॅग्स :आर्यन खानबॉलिवूडदिल्लीशाहरुख खानगौरी खान