अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने (NCB) शनिवारी मुंबईतील (mumbai) एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला. यावेळी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानसह अन्य ८ जणांना ताब्यात घेतलं. आर्यनला ड्रग्स पार्टी प्रकरणी अटक झाल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातून आर्यनची सुखरुप सुटका व्हावी यासाठी शाहरुख प्रयत्न करत असून त्याने प्रसिद्ध वकील सतीश मान-शिंदे यांची मदत घेतली आहे. सतीश मान-शिंदे हे आर्यनची बाजू कोर्टात मांडणार आहेत.
सतीश मानशिंदे यांनी आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची बाजू कोर्टात मांडली आहे. कलाविश्वातील सर्वात प्रभावी वकील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणूनच, सतीश यांची एका दिवसाची फी नेमकी किती असावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Mumbai Cruise Drugs Bust: आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुख खान घेतोय 'या' वकिलाची मदत
सतीश मान-शिंदे यांनी आतापर्यंत सलमान खान, संजय दत्त, रिया चक्रवर्ती यांची बाजू कोर्टात मांडून त्यांची कायद्याच्या कचाट्यातून सुखरुप सुटका केली आहे. त्यामुळे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी शाहरुखनेदेखील सतीश मान-शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे.
Aryan Khan Arrest updates: ...तर किंग खानच्या मुलाला १० वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा?
कोण आहेत सतीश मान-शिंदे?
सतीश मानशिंदे हे देशातील हाय प्रोफाईल प्रकरणातील टॉप वकिलांपैकी एक आहेत. १९९३च्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला अटक झाली होती. यावेळी त्यांनीच संजय दत्तला या प्रकरणातून बाहेर काढलं होतं. तेव्हापासून सतीश मानशिंदे चर्चेत आले होते. मुंबईतील एक प्रसिद्ध वकील आणि विश्वासनीय चेहरा म्हणून सतीश माने-शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे सतीश मान-शिंदे प्रत्येक केस लढण्यासाठी प्रचंड मानधन घेत असून त्यांची एका दिवसाची फी चक्क १० लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं.
आर्यनला होऊ शकते १ वर्षापर्यंत शिक्षा?
आर्यनवर केवळ एनडीपीएसच्या कलम २७ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला २० हजार रुपये दंड आणि १ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असं एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.