Join us

Aryan Khan Drugs Case:१९९३च्या बॉम्बस्फोटात शाहरुखने दिला होता संजयला पाठिंबा; आता मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 11:57 AM

Aryan Khan Drugs Case: सध्या सोशल मीडियावर १९९३ सालचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी संजय दत्तला पाठिंबा दिला होता.

ठळक मुद्देविशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान व अन्य आरोपींच्या  न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. 

शाहरुख खानचा (shahrukh khan) लेक आर्यन (Aryan Khan) ड्रग्स पार्टी (Drugs Case) प्रकरणात चांगलाच अडकला आहे. स्पेशल NDPS कोर्टाने आर्यनसह अन्य तिघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये आर्यनवर तब्बल ४ वेळा ही वेळ आली असून यापुढे ३० ऑक्टोबरपर्यंत त्याला आर्थर रोड तुरुंगातच रहावं लागणार आहे. त्यामुळे सध्या शाहरुख आणि गौरी (gauri khan) प्रचंड तणावाखाली आहेत. त्यांच्या या संकटात काळात बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा दिला आहे. तर काही दिग्गज सेलिब्रिटींनी मात्र पाठ फिरवली आहे. यात अभिनेता संजय दत्तचाही (sanjnay dutta) समावेश आहे. विशेष म्हणजे एकेकाळी संजयसाठी पाठिंबा देणाऱ्या शाहरुखकडे संजू बाबाने पाठ फिरवल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. 

शाहरुखने दिला होता संजयला पाठिंबा

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींचा १९९३ सालचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी (1993 bomb blast) संजय दत्तला पाठिंबा दिला होता. यात शाहरुख खानचाही समावेश होता.  सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हातात पोस्टर घेऊन संजयला पाठिंबा दिला होता. परंतु, आता आर्यन खानच्या प्रकरणात संजयने मात्र, शाहरुखकडे पाठ फिरवली आहे. 

'Sanju We're With You' असं लिहिलेले पोस्टर शाहरुखने हातात घेतले होते. परंतु, आता संजयने शाहरुखकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आर्यनला अटक झाल्यानंतर संजयने शाहरुखची साधी विचारपूसदेखील न केल्याचं सांगण्यात येत आहे.

संजयने का फिरवली शाहरुखकडे पाठ?

शाहरुखला खरी गरज असताना बॉलिवूडमधील हे दिग्गज सेलिब्रिटी कुठे गेले असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. आता शाहरुखसोबत नेमकं कोण आहे? संजय, अक्षय, सैफ हे कलाकार सुद्धा शाहरुखसोबत नाहीत. फक्त सलमान खान त्याच्या बाजूने आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे. 

दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. दरम्यान, विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान व अन्य आरोपींच्या  न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. 

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीशाहरुख खानसंजय दत्तनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो