मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने समन बजावले आहे. एसआयटीने ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला आजच चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीचे विशेष तपास पथक तपास करत असलेल्या 6 प्रकरणांमधील सर्व आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून आर्यन खानलाही आज समन बजावण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला रविवारी सहा वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.(Aryan Khan Summon By NCB SIT)
एनसीबीच्या एसआयटीने नवाब मलिक यांचा जावई समीर खान यालाही चौकशीसाठी बोलावले आहे. एसआयटी ज्या सहा प्रकरणांचा तपास करत आहे, त्या सर्व लोकांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. एनसीबीची ही टीम क्रूझवरही गेली होती आणि तेथे क्राईम सीन रीक्रिएट करण्यात आला होता. ड्रग्स प्रकरणाशी संबंधित असलेला आणखी एक आरोपी अरबाज मर्चंटलाही एनसीबीच्या एसआयटीने चौकशीसाठी बोलावले आहे.
जामीनावर बाहेर आहे आर्यन खान -आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. NCB ने 2 ऑक्टोबरच्या रात्री त्याला कॉर्डेलिया क्रुझवरून ताब्यात घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी अटक केली होती. आर्यनशिवाय, याप्रकरणी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती.
'या' अटींवर मिळालाय आर्यनला जामीन -1. आर्यनच्या वतीने 1 लाखांचा पर्सनल बाँड जमा करावा लागेल.2. किमान एक अथवा त्याहून अधिक जामीनदार द्यावे लागतील.3. NDPS न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही.4. तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबई सोडता येणार नाही.5. ड्रग्ससारख्या कुठल्याही अॅक्टिव्हिटीत सापडल्यास तत्काळ जामीन रद्द केला जाईल. 6. या प्रकरणासंदर्भात मीडिया अथवा सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची वाच्चता करू नये.7. दर शुक्रवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या कार्यालयात सकाळी 11 ते दोपारी 2 वाजेदरम्यान यावे लागेल.8. खटल्याच्या नियोजित तारखेला न्यायालयात हजर राहावे लागेल.9. कुठल्याही वेळी बोलावल्यानंतर एनसीबी कार्यालयात जावे लागणार.10. प्रकरणातील इतर आरोपी अथवा व्यक्तींसोबत संपर्क अथवा बोलता येणार नाही.11. एकदा ट्रायल सुरू झाल्यानंतर यात कुठल्याही प्रकारचा विलंब करणार नाही.12. आरोपी असे कुठलेही कृत्य करणार नाही, ज्यामुळे कोर्टाच्या कार्यवाहीवर अथवा आदेशांवर विपरीत परिणाम होईल.13. आरोपी वैयक्तिकरित्या अथवा इतर कुणाकडूनही साक्षीदारांना धमकावण्याचा, त्यांना प्रभावित करण्याचा किंवा पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही.14. जर अर्जदाराने/आरोपीने यांपैकी कुठलाही नियम मोडला तर, त्याचा जमीन रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा NCB कडे अधिकार आहे. NCB न्यायालयात जाऊ शकते.