Aryan Khan : बॉलिवुड किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान लवकरच बॉलिवुड डेब्यु करणार आहे. आर्यनने स्वत:च सोशल मीडिया२वरुन याची घोषणा केली होती. आर्यन लवकरच होम प्रोडक्शनमधील एका सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. आता आर्यन आणखी एका क्षेत्रात पाऊल टाकत आहे. आर्यन खान आता व्यावसायिक क्षेत्रातही आपले नशीब आजमावणार आहे.
व्होडका ब्रॅंड लॉंच करणार
शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान भारतात प्रिमियम व्होडका ब्रॅंड (Premium Vodka Brand) लॉंच करण्याच्या तयारित आहे. यासाठी आर्यन आणि त्याच्या पार्टनर्सने दारु बनवणाऱ्या कंपनीसोबत टायअप केले आहे. युरोप बेस्ड बिझिनेस पार्टनर बंटी सिंह (Bunty Singh) आणि लेटी ब्लागोएवा (Leti Blagoeva) यांच्यासोबत मिळून आर्यन या क्षेत्रात उतरणार आहे. अल्ट्रा प्रिमियम वोडका ब्रॅंड डायवोल असे त्यांच्या ब्रॅंडचे नाव असेल. जगातील सर्वात मोठी कंपनी AB InBev (Anheuser-Busch InBev )ने आर्यनच्या स्लॅब व्हेंचर्ससोबत पार्टनरशिप केली आहे. आर्यन खानने सांगितले, त्याला तरुणांची मानसिकता काय आहे हे माहित आहे. भारतीय बाजारात अजुन विकासाला थारा आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला बेवरेज कंपनीच्या माध्यमातुन व्हिस्की आणि रम सारखी ब्राऊन स्पिरिट लॉंच केली जाईल. व्होडका ब्रॅंड लॉंच केल्यानंतर ब्राऊन स्पिरिट बाजारात आणून त्याचा विस्तार करण्याची तिघांची योजना आहे. यासाठी त्यांनी एका कंपनीची स्थापना केली आहे. स्लॅब व्हेंचर्स (Slab Ventures) असे कंपनीचे नाव आहे.
आर्यन खानला अभिनयात काहीच रस नाहीृ तर त्याला व्यावसायिक क्षेत्रातच जास्त इंटरेस्ट आहे. व्होडका ब्रॅंडनंतर आर्यन आणखीही काही ब्रॅंड लॉंच करण्याच्या तयारित आहे.
क्रुझमध्ये ड्रग्स घेतल्या प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती. अनेक दिवस तो तुरुंगात होता. खान कुटुंब यावेळी मोठ्या अडचणींना सामोरे गेले होते. आता मात्र आर्यनचे आयुष्य वळणावर येत आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर आर्यन एक बिझिनेसमॅनही बनण्याच्या तयारित आहे.