Join us

तुरुंगातून बाहेर आल्यावर अशी झालीय Aryan Khanची अवस्था; जवळच्या मित्रानं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:14 AM

 Aryan Khan Drug Case : आर्यन खान भलेही तुरुंगातून घरी आलाय. पण गेल्या काही दिवसांत आर्यनने जे काही सहन केलं त्यातून बाहेर पडायला त्याला कदाचित बराच वेळ लागेल, असं दिसतंय.

 Aryan Khan Drug Case : बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan)  26 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर जामीनावर सुटका झाली. आर्यन खान भलेही तुरुंगातून घरी आलाय. पण गेल्या काही दिवसांत आर्यनने जे काही सहन केलं त्यातून बाहेर पडायला त्याला कदाचित बराच वेळ लागेल, असं दिसतंय. तुरुंगातून घरी परतल्यानंतर आर्यनच्या वागणुकीत बराच बदल झाला आहे. आर्यन आधीच स्वभावाने शांत आहे. पण आता तो अधिकच शांत राहू लागला आहे. त्याने स्वत:ला त्याच्या खोलीत  कोंडून घेतलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला आर्यनच्या एका मित्रानं दिलेल्या माहितीनुसार, आर्यन ना कुणाशी बोलतोय, ना कुणाला भेटतोय. तो अधिकाधिक वेळ त्याच्या खोलीत असतो. खोलीतून तो क्वचितच बाहेर पडतो. आधीच शांत राहणारा आर्यन ड्रग्ज प्रकरणानंतर आणखीच शांत, अबोल झाला आहे. जामीनावर सुटून तो घरी आला त्याला आठवडा होत आला. पण अद्यापही तो सावरलेला नाही. त्याच्या कुटुंबाने त्याला त्याची ‘स्पेस’ देण्याचा निर्णय घेतला आहे. हळूहळू आर्यन यातून बाहेर पडेल, असं कुटुंबीयांचं मत आहे.

बॉडीगार्ड हायर करण्याचा काहीही प्लान नाही...आर्यनसाठी बॉडीगार्ड हायर करण्याचा, त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्याचा निर्णय शाहरूख व गौरीनं घेतला असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. पण सूत्रांच्या मते, तूर्तास तरी असा कोणताही प्लान नाही. शाहरूख सध्या 24 तास आपल्या मुलासोबत आहेत. त्याने सर्व शूटींग शेड्यूल लांबणीवर टाकलं आहे. याक्षणी तो आपल्या मुलासोबत राहू इच्छितो. गेल्या 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणा-या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. यानंतर काही तासांत त्याला अटक करण्यात आली होती. ड्रग्जच्या खरेदीमध्ये आर्यनचा सहभाग असल्याचा आरोप एनसीबीने केला होता. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह 8 लोकांना एनसीबीने अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांना सशर्त जामीन मंजूर केला.  

टॅग्स :आर्यन खानशाहरुख खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी