आशा भोसले यांचा आज म्हणजेच आठ सप्टेंबरला वाढदिवस आहे. १९४३ पासून ते आजवर आशा यांनी अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. त्यांनी चुनरिया या सिनेमाद्वारे बॉलिवूडमधील त्यांच्या गायनाला सुरुवात केली. बॉलिवूडमधील महान गायकांमध्ये आज त्यांची गणना होते. त्यांनी १६ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपूरी, तमीळ, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांमधील त्यांची गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. आशा भोसले यांनी आजवर अनेक अडचणींवर मात करत यश मिळवले आहे. आशा भोसले यांचे वडील दिनानाथ मंगेशकर एक महान गायक होते. लता मंगेशकर यांना त्यांनी लहानपणापासूनच गायनाचे धडे दिले. वडील आणि बहीण घरी रियाज करत असताना आशा त्यांना नेहमी पाहात असत.
आशा भोसले या लहान असताना आपण देखील इतर मुलांप्रमाणे शाळेत शिकावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्या एकदा लता यांच्यासोबत शाळेत गेल्या. पण एका मुलाच्या फी मध्ये दोन मुलांना शिकवले जाणार नाही असे शिक्षकांनी त्यांना सुनावले. हे ऐकून आशा आणि लता यांना त्यांचे अश्रू आवरले नाहीत. दिनानाथ मंगेशकर यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी दोघींना शाळेत न पाठवता दोघींचे शिक्षण घरातच सुरू केले. आशा यांनी खूपच लहान वयात गायनाला सुरुवात केली. त्यावेळी लता मंगेशकर, गीता बाली, शमशाद बेमग यांसारख्या गायिका बॉलिवूडवर राज्य करत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशा भोसले यांच्या वाट्याला येत असत. तसेच सहअभिनेत्री, खलनायिका यांच्यावर चित्रीत केल्या जाणाऱ्या गाण्यांसाठीच आशा भोसले यांचा विचार केला जात असे. पण ही परिस्थिती काहीच वर्षांत बदलली. जाणून घेऊया त्यांची काही प्रसिद्ध गाणी -
चुरा लिया है
इन आखों की मस्ती
मेरा कुछ सामान
पिया तू अब तो आजा
दम मारो दम
आइये मेहेरबान
ये मेरा दिल
जाईये आप कहा जायेंगे
जरा सा झुम लू मैं
झुमका गिरा रे