Asha Parekh : महिलांच्या ड्रेसिंग स्टाईलवरुन सध्या सतत वादविवाद होत आहेत. Western Culture पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारत महिला तसेच कपडे परिधान करत आहेत यावरुन अनेक जण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. एका पॉडकास्ट शो मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी महिला जास्त करुन western वेस्टर्न कपडेच का घालतात यावर आक्षेप घेतला होता. आता ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी देखील महिलांवरुन भाष्य केले आहे जे चर्चेत आहे.
53rd Iffi Goa गोवा येथे सुरु असलेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशा पारेख सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवात आशा पारेख यांनी सध्याचे चित्रपट, सोसायटी कल्चर आणि महिलांविषयी चर्चा केली. 'आजकाल मुली किंवा महिला लग्नात सुद्धा गाऊन घालून येतात. एवढे वेस्टर्नायझेशन झाले आहे. घागरा चोळी, साडी, सलवार कुर्ता हे भारतीय कपडे आहेत की ते का नाही घालत असा प्रश्न उपस्थित केला. आपण खुपच वेस्टर्नाइज्ड झालो आहे यावर नाराजीही व्यक्त केली. सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. सध्या जे सिनेमे बनत आहेत ते माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.'
त्या पुढे म्हणाल्या, 'सिनेमात जे अभिनेत्री घालत आहेत तेच महिलांना परिधान करायचे आहे. त्यांना कॉपी करायचे असते. जाड असो किंवा कसेही महिला वेस्टर्नच कपडे घालत आहेत. ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती खुप महान आहे. '
दिलीप कुमार यांच्यासोबत काम का नाही केले ?
आशा पारेख आणि दिलीप कुमार यांच्यात वाद होते म्हणून त्यांनी एकत्र काम केले नाही असे बोलले जायचे. यावरही आशा पारेख यांनी खुलासा केला. त्या म्हणाल्या, ५ वर्षांपुर्वी कोणीतरी लिहिले मी दिलीपजींना पसंत करत नाही म्हणून त्यांच्यासोबत काम केले नाही हे खोटे आहे. मला मी त्यांची चाहती होते च्यांच्यासोबत काम करायची माझीही इच्छा होती. आम्ही एक सिनेमा साईनही केला होता. माझे नशीबच खराब तो सिनेमा पुढे बनलाच नाही.
आशा पारेख या ६० आणि ७० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. तसेच जास्त मानधन घेणाऱ्या होत्या. भारतीय सिनेमात त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांना पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.