Join us

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अन् आयुष्यभर अविवाहित राहिली बॉलिवूडची अभिनेत्री, आता खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 12:34 PM

या अभिनेत्रीने जगाच्या पाठीवर असंख्य चाहते निर्माण केलेत. पण ख-या आयुष्यात मात्र ती कायम एकटी राहिली.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या आशा पारेख यांनी चाहत्यांना वेड लावले. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. गुजरातच्या महुआ येथे मध्यवर्गीय गुजराती कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला.  40 वर्षांच्या कारकिर्दीत आशा पारेख यांनी 90 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1972 मध्ये कटी पतंग या चित्रपटासाठी आशा पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

आशा पारेख यांना 5 पेक्षा जास्त वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. आशा पारेख यांचे खरे आयुष्य चित्रपट कथेपेक्षा कमी नव्हते. जगाच्या पाठीवर असंख्य चाहते निर्माण केलेत. पण ख-या आयुष्यात मात्र त्या कायम एकट्या राहिल्या. अखेर असे काय झाले की, आशा पारेख यांनी आजन्म अविवाहित राहणे पसंत केले?

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आशा पारेख यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्यामागचं कारण सांगितलं. आशा पारेख म्हणाल्या की, त्या नासिर हुसैनच्या प्रेमात पडल्या होत्या. आशा पारेख आणि नासिर हुसेन यांचीही चांगली मैत्री होती. पण आशा त्याच्यावर प्रेम करत होती. जरी नासिर हुसेन आधीच विवाहित होते. याच कारणामुळे आशा पारेख यांनी आपल्या प्रेमाचा त्याग केला. 

आशा व नासिर हुसैन यांचे दीर्घकाळ अफेअर होते. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. आशा प्रेमात पडल्या त्यावेळी नासिर साहेब विवाहित होते. नासिर यांनी संसार मोडून आपल्याशी लग्न करावे, हे आशा यांना मान्य नव्हते. त्याचमुळे दोघांनी लग्न केले नाही. पुढे आशा यांनी कधीच लग्न केले नाही. आशा पारेख यांच्या द हिट गर्ल या ऑटोबायग्राफीत देखील या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटी