हिंदी मालिका आणि वेबसीरिजमध्ये झळकलेला अभिनेता आशिष दीक्षित लवकरच टिंडर्स वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. आशिष दीक्षित अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत होता. मात्र सॉफ्टवेअर कंपनीत सहा महिने काम केल्यानंतर त्याला सिनेइंडस्ट्री खुणावू लागली आणि त्याने त्या नोकरीला रामराम केला.
अभिनेता आशिष दीक्षितचा जन्म उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये झाला आहे. तो तीन महिन्यांचा असताना त्याची फॅमिली कल्याण येथे स्थलांतरीत झाले. त्याने कल्याणमधील मॉडेल कॉलेजमधून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आणि नागपूर विद्यापीठातीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर सहा महिने एका सॉफ्टवेअर कंपनीत काम केल्यानंतर त्याला सिनेइंडस्ट्री खुणावू लागली.
आशिषने डिसेंबर २०१३मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. छोट्या पडद्यावरील मालिका आप के आ जाने सेमधील गुड्डूच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला. ही मालिका साउथ आफ्रिका आणि युकेमध्ये प्रसारीत झाले. तिथेदेखील त्याच्या कामाचे कौतूक झाले. याशिवाय त्याने गंदी बातच्या चौथ्या सीझनमध्ये प्रेमची भूमिका केली होती. त्याच्या या भूमिकेलाही चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.
लॉकडाउनपूर्वी त्याच्याकडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी साधून आली होती. मात्र लॉकडाउननंतर ही संधी देखील गेली. याबद्दल तो म्हणाला की, २८ जुलै, २०१९ला राम गोपाल वर्माचा हॉरर चित्रपटाचा सीक्वल साइन केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगला २०२०च्या जानेवारीपासून सुरूवात होणार होती. मात्र शूटिंग पुडे ढकलण्यात आले आणि त्यानंतर लॉकडाउन सुरू झाले. लॉकडाउननंतर आता समजले की चित्रपट बनणार नाही.
आशिष दीक्षितच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर तो टिंडर्स वेबसीरिज लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याच्या आणखी तीन वेबसीरिज येणार आहे.