Join us

आशिष विद्यार्थी झळकणार कहानीबाज या लघुपटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:23 PM

आशिष विद्यार्थीचा समावेश असलेली कहानीबाज ही लघुकथा एक आकर्षक थ्रिलर आहे. त्यात टॅक्सी ड्रायव्हर आणि शिर्डीला चाललेल्या एका जोडप्याची गोष्ट आहे.

संदीप वर्मा कहानीबाज हा नवा लघुपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. आशिष विद्यार्थीचा समावेश असलेली ही लघुकथा एक आकर्षक थ्रिलर आहे. त्यात टॅक्सी ड्रायव्हर आणि शिर्डीला चाललेल्या एका जोडप्याची गोष्ट आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत परनॉड रिकॉर्डचे मुख्य मार्केटिंग अधिकारी कार्तिक मोहिंद्र सांगतात, आम्हाला रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स या आमच्या व्यासपीठावर कहानीबाज प्रदर्शित करताना आनंद होत आहे आणि संदीप वर्मा आणि आशिष विद्यार्थी यांच्यासारख्या उत्तम दिग्दर्शक आणि कलाकारांची साथ लाभल्याबद्दलही आम्हाला खूप अभिमान वाटतो. ब्रँडच्या मेक इट परफेक्ट या तत्वज्ञानानुसार आम्ही अत्यंत बुद्धिमान चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देत आहोत आणि त्यांची कलात्मकता आमच्या माध्यमातून लोकांसमोर आणत आहोत.

शिर्डीला जाण्याच्या वाटेवर टॅक्सीचालक प्रवाशांना एक गोष्ट सांगतो आणि त्यांची मते विचारतो. त्यांच्या उत्तरांमुळे प्रवाशांना चालकाकडून अनपेक्षित प्रतिक्रिया मिळतात. या लघुपटातून नायकाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तसेच इतर व्यक्तिरेखा परिस्थितीशी कशा जुळवून घेतात हे दिसून येते.

या लघुपटाबाबत बोलताना दिग्दर्शक संदीप वर्मा सांगतात की, कहानीबाज हा असा रोमांचकारी चित्रपट आहे जो आपण फक्त डिजिटलवर करू शकतो. त्यातून नेहमीच्या पटकथेचे नियम मोडीत काढले जातात आणि एक नाट्यमय आणि भावनिक रोमांचकथा सांगण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्र वापरले जाते. प्रेक्षकांनी खुन्याला सहानुभूती द्यावी, असा माझा प्रयत्न आहे. माझ्यासाठी आशिषमधील महान कलाकाराचा नव्याने शोध घेणेही महत्त्वाचे होते... ज्याला मी अनेक वर्षांपूर्वी नाटकात पाहिले होते. तो आपल्या अभिनयाने चित्रपटावर जादू करतो. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सकडून अत्यंत बुद्धिमान कलाकारांना एकत्र आणले जात आहे आणि त्यांना आजच्या प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवणाऱ्या कथा सांगण्यासाठी उत्तम व्यासपीठ दिले जात आहे. या नवीन लघुपटासह त्यांच्यासोबत जोडले जाताना मला अभिमान वाटतो.

या प्रदर्शनाबाबत बोलताना अभिनेता आशिष विद्यार्थी सांगतो, आतापर्यंत आपण जे ऐकत होतो ते आता पाहता येणार आहे. या लघुपटात काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता.