आशुतोष गोवारीकर (ashutosh govarikar) यांचा लेक कोणार्क गोवारीकरचं (konark govarikar) थाटामाटात लग्न पार पडलं. लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकर अत्यंत उत्साहात सहभागी झाले होते. आशुतोष गोवारीकर यांचा मराठमोळा पारंपरिक थाट सर्वांच्या पसंतीस उतरला. आशुतोष गोवारीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये स्वतःच दिग्दर्शित केलेल्या 'लगान' सिनेमातील गाण्यावर आशुतोष थिरकताना दिसले. पहिल्यांदाच आशुतोष यांना नृत्य करताना पाहून त्यांच्या चाहतांना आनंद झाला.
लेकाच्या लग्नात आशुतोश थिरकलेसोशल मीडियावर आशुतोष गोवारीकर यांचा लेक कोणार्कच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झालाय. यात आशुतोष खाली कुटुंबासोबत बसलेले असतात. अचानक स्टेजवरील माणसं खाली येऊन आशुतोष यांच्या हाताला धरत त्यांना स्टेजवर घेऊन येतात. पुढे 'लगान'मधील 'मितवा' गाण्यावर आशुतोष सर्वांसोबत खास डान्स करतात. आशुतोष यांना पहिल्यांदाच असं बिनधास्त आणि दिलखुलास नाचताना पाहून सर्वच अवाक् होतात. आशुतोष यांच्या डान्सला सर्वांनी चांगलीच दाद दिली.
आशुतोष गोवारीकर यांचा लेक कोणार्क गोवारीकर काल २ मार्चला लग्नबंधनात अडकणार आहे. नियती कनकियासोबत कोणार्कने लग्न केलं. प्रसिद्ध रिअल इस्टेट टायकून रसेश बाबूभाई कनकिया यांची ही मुलगी आहे. आशुतोष यांच्या लेकाच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. याशिवाय आशुतोष यांचे मित्रपरिपार, कुटुंबियांच्या उपस्थितीत कोणार्क - नियतीचा लग्नसोहळा पार पडला.