आशुतोष गोवारीकर पुन्हा घेऊन येणार ऐतिहासिक चित्रपट; ‘पानिपत’चे फर्स्ट लूक जारी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 6:32 AM
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा याआधीचा चित्रपट ‘मोहंजोदारो’ बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. पण आशुतोष गोवारीकरण पुन्हा एकदा पीरियड ...
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा याआधीचा चित्रपट ‘मोहंजोदारो’ बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. पण आशुतोष गोवारीकरण पुन्हा एकदा पीरियड ड्रामा घेऊन येण्यास सज्ज आहेत. ज्याची अधिकृत घोषणा झालीयं. सोबतच या चित्रपटाचे फर्स्ट लूकही समोर आलेयं. या चित्रपटाचे नाव आहे, ‘पानिपत’. नाव ऐकल्यानंतरचं या चित्रपटात काय असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकतो. होय, पानिपतचं तिसरं युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की ही युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता. पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधीआणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफा यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.१५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात दुसरे युद्ध लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झाली व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले. १७६१ रोजी मराठे सदाशिवराव पेशवे आणि अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली यांच्यात तिसरे युद्ध झाले. या युद्धात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले,पण अब्दालीचीही मोठी हानी झाली. या तिस-या युद्धावर आधारित ‘पानिपत’ हा चित्रपट घेऊन आशुतोष गोवारीकर येत आहे. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सॅनन यासारख्या बॉलिवूड अभिनेत्यांची वर्णी लागली आहे. जबरदस्त अॅक्शनचा हा ‘बिग बजेट’ सिनेमा या वर्षाच्या मध्याला सुरु होईल आणि पुढीलवर्षी ६ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या निमित्ताने अर्जुन कपूर आणि संजय दत्त पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. सूत्रांचे मानाल तर अर्जुन यात मराठी योद्धा साकारणार आहे तर संजयची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. अर्जुनने याआधी कधीही ऐतिहासिक भूमिका साकारलेली नाही. त्यामुळे त्याच्यासाठी हे संधी कुठल्या आव्हानापेक्षा कमी नाही.ALSO READ : संजय दत्तच्या एका फॅनने आपली संपत्ती केली संजयच्या नावावर, मृत्यूपत्रात वारस म्हणून लिहिले संजयचे नाव