Join us

आशुतोष गोवारीकरच्या पुढच्या सिनेमातही हृतिक रोशन?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2017 10:27 AM

भारतीय सिनेमाला आॅस्करमध्ये घेऊन जाण्याचा मान मिळवणारे दिग्दर्शक म्हणून आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक आणि भव्य चित्रपटांची निर्मिती म्हणजे ...

भारतीय सिनेमाला आॅस्करमध्ये घेऊन जाण्याचा मान मिळवणारे दिग्दर्शक म्हणून आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक आणि भव्य चित्रपटांची निर्मिती म्हणजे त्यांचे वैशिष्ट्य. प्रेक्षक त्यांच्या प्रत्येक नव्या सिनेमाची वाट पाहत असतात. त्यामुळे ‘मोहेंजदडो’चे अपयश मागे सारून ते कोणता प्रोजेक्ट हाती घेतात याबाबत उत्सुकता आहे.मंगळवारी (दि. ३१ जानेवारी) पार पडलेल्या ‘लोकमत महाराष्ट्र मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स’ शोमध्ये ‘मोस्ट स्टायलिश फिल्ममेकर’ ठरलेल्या गोवारीकरांनी सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘माझा पुढचा चित्रपट कोणता असेल याची घोषणा येत्या महिनाभरात केली जाणार आहे. त्याचा विषय काय, त्यामध्ये कोण अ‍ॅक्टर असणार, याची माहिती तुम्हाला येणाऱ्या काळात कळेलच.’‘तुमच्यासाठी स्टाईल म्हणजे काय?’ असे विचारले असतो ते म्हणाले, ‘स्टाईल म्हणजे ५० टक्के तुम्ही काय आहात आणि ५० टक्के तुम्ही काय दाखवता.’ बॉलीवूडमध्ये सर्वात स्टायलिश कोण हे सांगण्यास मात्र त्यांनी टाळाटाळ केली. त्यांच्या मते, ‘सगळेचे सिलेब्रिटी स्टायलिश आहेत. अन्यथा ते स्टार कसे झाले असते? त्यामुळे कोणा एकाचे नाव घेणे उचित ठरणार नाही.’ALSO READ: सेलिब्रेटींच्या उपस्थित पार पडला सर्वात स्टायलिश अवॉर्ड सोहळागोवारीकर पुन्हा एकदा हृतिक रोशनला घेऊन चित्रपट बनवू इच्छितात, अशी इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा आहे. परंतु ‘मोहेंजोदडो’ बॉक्स आॅफिसवर सपाटून आपटल्यामुळे हृतिक त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्यास किती उत्सुक असेल याबाबत शंका आहे.विशेष म्हणजे या अवॉर्ड सोहळ्याला हृतिकही उपस्थित होता. तरीदेखील त्यांनी त्याचे नाव घेतले नाही यावरून दोघांमध्ये सर्व काही ‘आॅन इज वेल’ आहे ना? असा प्रश्न विचारला जातोय. हृतिक आणि पूजा हेगडे अभिनित ‘मोहेंजोदडो’ची बॉक्स आॅफिसवर अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’शी टक्कर झाली होती. त्यामध्ये अक्षयने बाजी मारली होती.हृतिक आणि गोवारीकर यांच्या जोडीने ‘जोधा-अकबर’सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा दिलेला असल्यामुळे या चित्रपटाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा होत्या. मात्र, यंदा त्यांना प्रेक्षकांचे ते प्रेम मिळाले नाही आणि चित्रपट सर्वात अपयशी चित्रपटांच्या यादीमध्ये सामील झाला.