Join us

आशुतोष गोवारीकर यांनी दिलं पंतप्रधान मोदींना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:45 IST

सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे.

Ashutosh Gowarikar: अभिनय ते दिग्दर्शन असा प्रवास करणारे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते आशुतोष गोवारीकर (ashutosh gowarikar) हे इंडस्ट्रीतील नावाजलेलं नाव आहे. 'स्वदेस' तसेच जोधा 'अकबर' या सुपरहिट चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. आशुतोष गोवारीकर यांचा मोठा मुलगा कोणार्क लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नासाठी मनोरंजन विश्वातील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अलिकडेच आशुतोष यांनी सपत्नीक आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आशुतोष यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. 

दरम्यान, आशुतोष गोवारीकर यांचा लेक कोणार्क प्रसिद्ध रिअल इस्टेट टायकून रसेश बाबूभाई कनकिया यांची मुलगी नियती कनकियासोबत लग्न करणार आहे. येत्या २ मार्च २०२५ रोजी कोणार्क आणि नियती एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत.  या लग्नात कोणार्क व नियती दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र-मैत्रिणी या लग्नात उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसह उद्योगविश्वातील नामांकित उद्योगपतींना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. 

कोणार्क गोवारीकरबद्दल सांगायचं झालं तर, त्याला सुद्धा अभिनय क्षेत्रात रुची आहे. कोणार्क वडिलांच्या पावलावरफाऊल ठेवत सध्या फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतो आहे. 

टॅग्स :आशुतोष गोवारिकरनरेंद्र मोदीबॉलिवूडसेलिब्रिटीलग्न