Join us

असिनने स्वत: सांगितला होता तिच्या नावाचा अर्थ, आमिरच्या सुपरहिट सिनेमातून झाली होती एंट्री

By गीतांजली | Updated: October 20, 2020 19:30 IST

असिनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

असिनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. क्वीन ऑफ कॉलिवूडच्या नावाने असिनला ओळखले जाते. आमिर खानसोबत असिनने गजिनीमध्ये काम केले होते. या चित्रपटानंतर तिला सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली. असिनने अक्षयसोबत हाऊसफुल २, खिलाडी ७८६ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि असिनची खूप चांगली मैत्री जमली होती. 

जेव्हा असिन इंडस्ट्री सक्रिय होती त्यावेळी तिला एका मुलाखती दरम्यान तिच्या नावाचा अर्थ विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली, असिन म्हणजे खूप सुंदर. 

असिन 2015 मध्ये आलेल्या ऑल इज वेल या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि राहुल शर्मासोबत संसार थाटला. असिन आपल्या करिअरची सुरुवात दक्षिणात्य चित्रपटातून केली. 19 जानेवारी 2016ला दिल्लीमध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचा को-फाऊंडर असलेल्या राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकत असिनने सगळ्यांना आश्चर्याया धक्का दिला होता. असिनने आधी राहुलसोबत चर्च मध्ये आणि नंतर हिंदु पद्धतीनुसार लग्न केले होते. राहुल आणि असिनची ओळख अक्षय कुमारने करून दिली होती.  

टॅग्स :असिन