Join us  

​अर्जून रामपाल का म्हणतोय, पैसे असतील तर प्लीज पाहा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 5:38 PM

अभिनेता अर्जून रामपाल सध्या लोकांना एक विनंती करताना दिसतोय. विनंती काय, तर खिशात पैसे असतील तर नक्की बघा, असे ...

अभिनेता अर्जून रामपाल सध्या लोकांना एक विनंती करताना दिसतोय. विनंती काय, तर खिशात पैसे असतील तर नक्की बघा, असे तो ज्याला त्याला सांगत सुटलाय. आता बघा म्हणजे काय बघा? तर ‘रॉक आॅन2’. होय, ‘रॉक आॅन2’ गत ११ नोव्हेंबरला रिलीज झाला. पण दुर्दैवाने हा रिलीज टाइमिंग चांगलाच चुकला. कारण ऐन ‘रॉक आॅन2’च्या रिलीजपूर्वी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १०००च्या नोटा चलनातून बाद केल्या. याचा जोरदार फटका ‘रॉक आॅन2’ ला बसलाय.   पैसेच नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवलीय. अर्जूनची ‘रॉक आॅन2’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. बॉक्सआॅफिसवर केवळ लोकांकडे पैसे नसल्याने चित्रपट चालत नाहीय म्हटल्यावर अर्जूनला दु:ख होणे साहजिक आहे. आज एका इव्हेंटमध्ये अर्जूनने हे दु:ख बोलून दाखवले. सरकारच्या निर्णयाचा संपूर्ण देशावर प्रभाव पडला आहे. लोकांकडे पैसा नाहीय. अशास्थितीत ‘रॉक आॅन2’ कसा बिझनेस करणार ? आमच्यासाठी आणि अन्य चित्रपटासाठी ही ‘दुर्दैवी’ वेळ आहे. ‘रॉक आॅन2’ हा एक उत्कृष्ट सिनेमा आहे. मी अजूनही लोकांना विनंती करेल की, ज्यांच्याजवळ पैसे आहेत, त्यांनी हा सिनेमा नक्की पाहावा, असे अर्जून म्हणाला. अर्थात याचवेळी त्याने मोदींच्या निर्णयाला पाठींबाही दिला. मोदींचा निर्णय योग्य आहे. या निर्णयाने का काळा पैसा असणाºयांचे धाबे दणाणले आहे. हा निर्णय देशासाठी फायदेशीर आहे. मी या निर्णयाचा सन्मान करतो, हे सांगायलाही तो विसरला नाही.