Join us

Shah Rukh Khan : भावा, खरं खरं सांग किती कमावलेस...? अखेर शाहरुखनं सांगितली 'पठाण'ची खरी कमाई..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 16:03 IST

'#AskSRK' या सेशनमध्ये बादशाहने चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत. यातला एक प्रश्न होता ‘पठाण'च्या कमाईबद्दलचा.

किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण'(Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण' या चित्रपटाद्वारे शाहरूखने वापसी केलीये आणि शाहरूखच्या या सिनेमांनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘पठाण' रोज नवे विक्रम रचतोय. ११ दिवसांत चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. साहजिकच शाहरूख जाम खुश्श आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर '#AskSRK'  सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.'#AskSRK' या सेशनमध्ये बादशाहने चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत. यातला एक प्रश्न होता ‘पठाण'च्या कमाईबद्दलचा.

‘पठाण'च्या कमाईचे आकडे समोर येत आहेत. रिपोर्टनुसार, गेल्या ११ व्या दिवसांत या सिनेमाने ४०१.४० कोटी कमावले. वर्ल्डवाईड हाच आकडा ७२५ कोटींवर पोहोचला. पण एका चाहत्याला कमाईचे हे आकडे किती खरे, किती खोटे, हे शाहरूखकडून ऐकायचं होतं. #AskSRK सेशनदरम्यान संबंधित चाहत्याने थेट शाहरूखलाच याबद्दल प्रश्न विचारला.

‘पठाण'चं रिअल कलेक्शन किती आहे?, असा सवाल या चाहत्याने केला. यावर शाहरूखने असं काही उत्तर दिलं की, सगळेच त्याच्यावर फिदा झालेत. ‘5000 करोड़ प्यार। 3000 करोड़ तारीफें। 3250 करोड़ हग्स… 2 बिलियन मुस्कुराहटें और अभी गिनती चल ही रही है। तेरा अकाउंटेंट क्या बता रहा है?’, असं उत्तर शाहरूखने दिलं.

एका चाहत्याने शाहरूखला एकदम वेगळा प्रश्न विचारला. तू हिरोचाच रोल करणार की, कधी हिरो व हिरोईनचा पापा बनण्याचंही काही प्लानिंग आहे?, असा सवाल या चाहत्याने केला. यावर, तुम बाप बनो, मैं हिरो ही ठीक हूं..., असं मजेशीर उत्तर शाहरूखने दिलं.

डंकीनंतर ॲक्शन सिनेमेच करणार का?, असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. यावर, हो यार... पण पेनकिलर खूप खाव्या लागतात, असं भन्नाट उत्तर त्याने दिलं.

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमाबॉलिवूड