गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वातून सातत्याने दु:खद बातम्या येत आहेत. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार किशोर दास (Kishor Das) यांचे निधन झाले आहे. सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना आणि जवळच्या मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे.
शनिवारी, २ जुलै रोजी चेन्नईतील रुग्णालयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. या आजारावर मात करण्यासाठी त्यांच्यावर बराच काळ उपचारही सुरू होते, मात्र दीर्घ लढ्यानंतर अखेर शनिवारी त्यांचं निधन झालं. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
रिपोर्टनुसार, किशोर दास चेन्नईपूर्वी गुवाहाटीमध्ये उपचार घेत होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना चेन्नईला आणण्यात आलं. या वर्षी मार्चमध्ये अभिनेत्याला अॅडवान्स ट्रीटमेंटसाठी चेन्नईला पाठवण्यात आले होते. दुसर्या रिपोर्टनुसार, कॅन्सर व्यतिरिक्त, किशोर यांना कोरोना देखील झाला होता.
कॅन्सरच्या काळात कोरोनामुळे त्यांची प्रकृती सतत खालावत गेली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आसामी अभिनेता किशोर दास हे एक प्रसिद्ध कलाकार होते, ज्यांनी एकेकाळी 300 संगीत अल्बममध्ये काम केले होते. त्यांचे तुरुत तुरुत हे गाणे आसामी इंडस्ट्रीतील पहिल्या क्रमांकाचे गाणे ठरले. चित्रपट आणि गाण्यांव्यतिरिक्त ते टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध कलाकार होते. अनेक लघुपटांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.