Join us

वयाच्या ७व्या वर्षी हृतिक रोशनचं या अभिनेत्रीवर जडलं होतं प्रेम, करायचं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 9:47 AM

Hritik Roshan : हृतिक रोशन त्याच्या प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन(Hritik Roshan)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलेआहे. अभिनेत्याने जेव्हापासून सिनेजगतात प्रवेश केला तेव्हापासून मागे वळून पाहिलेच नाही. हृतिक रोशनने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. हृतिक रोशन त्याच्या प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. हृतिक रोशनच्या बालपणातील एक घटना आहे त्याने एक विनंती केली होती जी पूर्ण होऊ शकली नाही.

हृतिक रोशनला फिल्मी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्याच्या घरात नेहमीच फिल्मी वातावरण राहिले आहे. हृतिक रोशनने वयाच्या सातव्या वर्षी 'मुघल-ए-आझम' चित्रपट पाहिला आणि त्याला मधुबाला खूप आवडल्या होत्या. हृतिक रोशनला मधुबाला इतक्या आवडल्या की तो त्यांच्याशी लग्न करण्यावर ठाम होता. ७ वर्षाच्या हृतिक रोशनने वडील आणि कुटुंबियांसमोर मधुबाला यांच्यासोबत लग्न करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा लोकांनी हृतिक रोशनचे ऐकले नाही तेव्हा तो संतापला. त्यानंतर वडिलांच्या स्पष्टीकरणानंतर काही वर्षांनी हृतिक रोशनला समजले की तो मधुबाला यांच्याशी लग्न करू शकत नाही. हृतिक रोशनने त्याच्या एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला होता.

हृतिक रोशनचे वैयक्तिक आयुष्यहृतिक रोशनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे लग्न सुजैन खानशी झाले होते आणि दोघांना दोन मुले आहेत. हृतिक रोशन आणि सुझैन खान विभक्त झाले आहेत. त्यानंतर अभिनेता गायक आणि अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशीपमध्ये आहे आणि अनेकदा त्यांच्या नात्याच्या बातम्या समोर येत असतात.

आगामी प्रोजेक्टहृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो दीपिका पदुकोण आणि अनिल कपूरसोबत 'फाइटर' चित्रपटात दिसणार आहे. हृतिक रोशनचा फायटर हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :हृतिक रोशन