अभिनेता सुनील शेट्टी हा लवकरच आजोबा होणार आहे. त्याची लेक आथिया शेट्टी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत विनिंग शॉट मारत टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या केएल राहुलच्या घरी आनंदाची बातमी आहे. अथिया आणि केएल राहुल (Athiya Shetty KL Rahul) आई बाबा होणार आहेत. अभिनेत्रीने बुधवारी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आथिया आणि केएल राहुल या लोकप्रिय जोडीतील रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळतेय.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी सुंदर असं फोटोशूट केलं आहे. फोटो शेअर करताना केएल राहुलने ''Oh, baby! 🍃🐣💐🪬♾💘", असे कॅप्शन दिले आहे. या फोटोंमध्ये आथिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. केएल आणि अथिया यांच्या या फोटोशूटवर सेलिब्रिटींनीसह चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडीनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. रिपोर्टनुसार अथिया एप्रिलमध्ये बाळाला जन्म देणार आहे.
केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांचा २३ जानेवारी २०१३ रोजी विवाह पार पडला होता. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर दोघांचा विवाह संपन्न झाला होता.अथियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने 'हिरो' या चित्रपटातून २०१५ साली सिनेविश्वात पदार्पण केले होते. तिने 'मुबारकाँ' आणि 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. सध्या ती बॉलिवूडपासून दूर आहे.