अथिया अन् के.एल. राहुलचं खुल्लमखुल्ला प्रेम! तिने शेअर केले रोमॅन्टिक फोटो, तो म्हणाला लव्ह यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:47 PM2022-04-18T14:47:53+5:302022-04-18T14:50:14+5:30
Athiya Shetty , KL Rahul : के. एल. राहुलचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त अथियाने खास पोस्ट शेअर केली आणि त्यावर लव्ह यू म्हणत के.एल.ने प्रेमाची जाहिर कबुली दिली.
अण्णांची लेक अर्थात सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. क्रिकेटपटू के. एल. राहुलच्या (KL Rahul) प्रेमात अथिया जणू वेडी झालीये. विश्वास बसत नसेल तर अथियाची ही पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी. होय, के. एल. राहुलचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त अथियाने खास पोस्ट शेअर केली आणि त्यावर लव्ह यू म्हणत के.एलने प्रेमाची जाहिर कबुली दिली. अथियाने के.एल. राहुलसोबतचे तीन ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.
एका फोटोत अथियाने के. एल. राहुलला हग केलं आहे तर दुसऱ्या फोटोत दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन जंगलात चालताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत दोघं सेल्फी घेत आहेत. अथियाने या फोटोंना सुंदर कॅप्शनही दिलं आहे. ‘तुझ्यासोबत कुठेही... वाढदिवसाच्या शुभेच्छा...,’असं तिनं लिहिलं आहे.
या फोटोंवरचा के. एल. राहुलचा रिप्लाय तर तुम्ही बघायलाच हवा. लव्ह यू म्हणत त्याने अथियावरचं प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या दोघांचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
याआधी अथियाच्या वाढदिवसाला म्हणजेच, गेल्या 5 नोव्हेंबरला केएलने तिला विश करत, तिच्यासोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला होता. हॅपी बर्थ डे माय हार्ट, असं लिहित त्यानं अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
अथिया आणि राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. खरे तर आत्तापर्यंत अथिया व केएल यांच्यापैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचं काम मात्र त्यांनी न चुकता केलं होतं. दोघांचे एकत्र फोटो शेअर करणं, एकत्र बाहेर फिरणं, एक दुस-यांचे फोटो शेअर करत त्यावर क्यूट कमेंट करणं यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे.