विकी कौशल व कतरिना कैफ यांच्यानंतर लवकरच बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. होय, अण्णाच्या लेकीने म्हणजे अथिया शेट्टीने (Athiya Shetty) क्रिकेटपटू के. एल. राहुलसोबतचं (KL Rahul) नातं ऑफिशिअल केलं आहे. बुधवारी 1 डिसेंबरला मुंबईत ‘तडप’ या चित्रपटाचा ग्रँड प्रीमिअर (Tadap premiere) पार पडला. या चित्रपटातून अण्णाचा लेक अहान शेट्टी (Ahan Shetty) बॉलिवूड डेब्यू करतोय. भावाच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमिअरला अथिया आली आणि एकटी नाही तर केएलसोबत तिने हातात हात घालून एन्ट्री घेतली.
‘तडप’च्या प्रीमिअरला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण अथिया व केएल या जोडीची सर्वाधिक चर्चा झाली. अथियाने केएलसोबत धमाकेदार एन्ट्री घेतली, त्यावेळी सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. दोघांनीही कॅमे-याला झक्कास पोझ दिल्या. अथिया व केएल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात होत्या. पण पहिल्यांदाच दोघंही एखाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये एकत्र दिसले आणि त्यांच नातं ऑफिशिअल झालं.यावेळी अथिया काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली तर केएल बेज कलरच्या सूटमध्ये दिसला.
याआधी अथियाच्या वाढदिवसाला म्हणजेच, गेल्या 5 नोव्हेंबरला केएलने तिला विश करत, तिच्यासोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला होता. हॅपी बर्थ डे माय हार्ट, असं लिहित त्यानं अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
अहानची गर्लफ्रेन्डही होती हजर‘तडप’च्या प्रीमिअरला अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तान्या श्रॉफ ही सुद्धा हजर होती. तिने अहानच्या मम्मी पापासोबत म्हणजे सुनील शेट्टी व माना शेट्टीसोबत मस्तपैकी पोझ दिल्यात.अहानचा ‘तडप’ हा सिनेमा उद्या 3 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. यात अहानसोबत तारा सुतारिया ही मुख्य भूमिकेत आहे. अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा ‘तडप’ हा चित्रपट तेलुगू ‘आरएक्स 100’चा हिंदी रिमेक आहे.