Join us

Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:06 IST

अथिया-के एल राहुलवर अभिनंदनाचा वर्षाव

अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटपटू के ए राहुल (K L Rahul) यांनी चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. नुकतंच अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली आहे. अथिया प्रेग्नंट असून लवकरच त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. अनेक दिवसांपासून अथियाच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. आता स्वत: अथियानेच बातमीला दुजोरा देत जाहीर केलं आहे. लग्नानंतर एका वर्षातच अथियाने ही गुडन्यूज दिली. दोघांवर मित्रमंडळी आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 

अथिया शेट्टीच्या प्रेग्नंसीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र दोघांनी यावर काहीच कमेंट केली नव्हती. आज अथियाने चाहत्यांना सरप्राईज करत गुडन्यूज दिली. तिने इन्स्टाग्रावमर पोस्ट शेअर करत लिहिले, "आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर आशीर्वाद लवकरच येतोय...२०२५". या पोस्टसोबत तिने 'नजर न लागो' असा इमोजीही पोस्ट केला आहे.

पुढील वर्षी अथिया शेट्टी बाळाला जन्म देणार आहे. सुनील शेट्टी आजोबा होणार असल्याने आनंदात आहेत. गेल्या वर्षी २३ जानेवारी रोजी अथिया आणि के एल राहुल यांनी लग्नगाठ बांधली. आता दोघंही आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात करत आहेत. दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच अनुष्का शर्माने 'अकाय'ला जन्म दिला. तर 'हिट मॅन' रोहित शर्माही दुसऱ्यांदा बाबा होणार अशी चर्चा आहे.

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुलपरिवारसोशल मीडिया