सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. होय, अथिया क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे. अद्याप दोघांनी याची कबुली दिली नाही. पण हो दोघांचे फोटो मात्र बरेच काही सांगताहेत. नुकताच अथियाने एक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहताच नेटक-यांच्या कमेंटचा पूर आला. खुद्द के़एल़ राहुलनेही या फोटोवर कमेंट केली.
अथियाचा हा फोटो पाहून के. एल. राहुलने स्वत:ला रोखू शकला नाही. मग काय, ‘अच्छी शर्ट है’ अशी कमेंट त्याने केली. राहुलची कमेंट पाहताच नेटकरीही अॅक्टिव्ह झालेत. यानंतर अनेकांनी अथियाच्या या शर्टवरून राहुलची मजा घ्यायला सुरुवात केली.