Join us  

पाकिस्तानी गायकाची भर कॉन्सर्टमध्ये लतादीदींना स्वरमयी आदरांजली, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 1:59 PM

ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत.

Tribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर यांची गाणी चाहत्यांच्या मनात कायम जीवंत आहेत. लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी नेहमीच सगळ्यांना एक जादुई विश्वाची सफर घडवली आहे. आपल्या आवाजाने लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या दीदी केवळ भारतात नाही तर विदेशातही तितक्याच प्रसिद्ध आहेत. नुकतेच एका लोकप्रिय पाकिस्तानी गायकाने लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हा स्टेजवर लता मंगेशकर यांचे सुपरहिट 'एक प्यार का नगमा' गाताना दिसत आहे. अबू धाबी कॉन्सर्टमध्ये त्याने हे गाणं गायलं आणि लता मंगेशकर यांना स्वरमयी आदरांजली वाहिली. व्हिडीओमध्ये आतिफ अस्लम हा पांढऱ्या शर्टमध्ये दिसतोय. तर त्याच्या मागे मोठ्या स्क्रीनवर लता मंगेशकर यांचा फोटो पाहयला मिळतोय. आतिफ अस्लमच्या कॉन्सर्टचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 एक अद्भूत गायिका म्हणून लता मंगशेकर यांच्याकडे पाहिलं जायचं. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं निधन झालं. लतादीदींनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर नेहमीच त्यांच्या सुरांच्या रूपांनी चाहत्यांच्या मनात अजरामर झाल्या आहेत. तर आतिफ अस्लमबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आपल्या गायनातून बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे.

टॅग्स :लता मंगेशकरपाकिस्तानसेलिब्रिटीसोशल मीडिया