Join us

गायक नाही तर आतिफ असलमला व्हायचं होतं क्रिकेटर? आईवडिलांमुळे भंगलं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 4:10 PM

तो म्हणाला होता की त्याने कधीच गायन क्षेत्रात येण्याचा विचार केला नव्हता. तो एक अॅथलीट आहे आणि त्याला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचे होते.

आपल्या गायनाने संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या पाकिस्तानी गायक आतिफ असलम(Atif Aslam) आज ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या तो वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्सर्ट्स करत आहे. आतिफने 2003 साली जल बँड सोबत म्यूझिक करिअरला सुरुवात केली. पण खूप कमी जणांना माहित असेल की आतिफला गायक नाही तर क्रिकेटर व्हायची इच्छा होती. 

पाकिस्तानी वृत्तानुसार, आतिफ असलमने एका टॉक शो मध्ये याचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की त्याने कधीच गायन क्षेत्रात येण्याचा विचार केला नव्हता. तो एक अॅथलीट आहे आणि त्याला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचे होते. आतिफ म्हणाला, "मी प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं प्लॅन करत होतो. मी अॅथलीट होतो. यासाठी मी खूप मेहनतही घेत होतो. पण माझ्या पालकांनी माझी ही इच्छा फक्त छंद म्हणूनच घेतली. त्यांना माहितच नव्हतं की मी किती उत्तम क्रिकेट खेळतो. मला क्रिकेट खेळणं सोडावं लागलं कारण त्या नादात मी क्लासेस बंक करायचो."

तो पुढे म्हणाला, "मी आयुष्यात काहीच करु शकत नव्हतो. पण संगीत क्षेत्रात मला रस निर्माण झाला. यातून मी स्वत:लाच शोधू शकलो. मी शांत आणि एकटा पडलो होतो. माझ्या अशा परिस्थितीत संगीतने मला शोधलं, शांत ठेवलं आणि देवाजवळ नेलं."

आतिफ अस्लमने 'तेरे लिए', 'तू जाने ना', 'तेरे संग यारा', 'जीना जीना' अशी एकापेक्षा एक गाणी गायली आहेत. आतिफचे भारतातही प्रचंड चाहते आहेत.

टॅग्स :पाकिस्तानसेलिब्रिटीसंगीत