Join us

ॲटली-सलमान खानचा सिनेमा डबाबंद! चर्चांना उधाण; काय आहे मुख्य कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:29 IST

ॲटलीच्या सिनेमात सलमानला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र आता चाहत्यांची निराशा झाली आहे.

२०२३ हे वर्षच शाहरुखसाठी होतं. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण', मध्ये 'जवान' तर वर्षाच्या अखेरीस 'डंकी' रिलीज झाला. या तीनही सिनेमांनी शाहरुखला पु्न्हा बॉलिवूडचा किंग बनवलं. 'जवान' हा साऊथ दिग्दर्शक ॲटलीने (Atlee) दिग्दर्शित केला होता. आपल्या पहिल्याच बॉलिवूडसिनेमात त्याने शाहरुखसोबत काम केलं होतं. 'जवान' तुफान हिट झाला. यानंतर आता ॲटली सलमान खानसोबत (Salman Khan) कधी काम करणार याचीही उत्सुकता होती. ॲटली आणि सलमान एका सिनेमासाठी एकत्रही आले. मात्र आता त्यांचा हा सिनेमा डब्बाबंद झाल्याची चर्चा आहे. 

सलमान खान ॲटलीच्या आगामी ॲक्शन ड्रामा सिनेमात दिसणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. या सिनेमासाठी ५०० कोटींचं बजेटही निश्चित झालं होतं. A6 असं सिनेमाटं टायटल होतं. मात्र आता त्यांचा हा सिनेमा सुरु होण्यापूर्वीच डबाबंद झाल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, हा सिनेमा सध्या बनणार नाही. वरुण धवनच्या बेबी जॉनच्या अपयशानंतर हा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. हा सिनेमा ॲटलीनेच निर्मित केला होता. तसंच ॲटली आता अल्लू अर्जुनसोबतच्या सिनेमाची तयारी करत आहे. चाहते सलमान आणि ॲटलीच्या सिनेमाची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा करत होते. मात्र आता त्यांची निराशा झाली आहे.

सलमान खानने 'बेबी जॉन'मध्ये १५ मिनिटांचा कॅमिओही केला होता. सिनेमा आपटल्याने आता ॲटली आणि सलमान दोघंही सावध पावलं टाकताना दिसत आहेत. सध्या 'सिकंदर' सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. ए आर मुरुगदास सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. साजिद नाडियादवाला बॅनरअंतर्गत सिनेमाची निर्मिती होत आहे. यामध्ये रश्मिका मंदाना पहिल्यांदाच सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'सिकंदर'नंतर सलमान 'किक २','दबंग ४','टायगर व्हर्सेस पठाण' या सिनेमांमध्येही दिसणार आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसिनेमाTollywood