Join us

​‘परमाणु’ने आणला जॉन अब्राहमला राग! करारचं केला रद्द!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 8:23 AM

जॉन अब्राहम सध्या जाम संतापला आहे. इतका की ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ या आगामी चित्रपटासंदर्भातले आपले सगळे ...

जॉन अब्राहम सध्या जाम संतापला आहे. इतका की ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ या आगामी चित्रपटासंदर्भातले आपले सगळे करार त्याने रद्द करून टाकले. होय, जॉनची प्रॉडक्शन कंपनी जे ए एंटरटेनमेंटने ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ प्रोड्यूस करणाºया क्रिअर्ज एंटरटेनमेंटसोबतचे सगळे करार रद्द केलेत. शिवाय क्रिअर्जला कायदेशीर नोटीसही बजावले. (जे ए एंटरटेनमेंट व क्रिअर्ज एंटरटेनमेंटने एकत्रितपणे ‘परमाणू’ प्रोड्यूस केला आहे.)क्रिअर्जने आपली फसवणूक केल्याचा आरोप जे ए एंटरटेनमेंटने केला आहे. क्रिअर्जने आम्हाला आमचा वाटा दिलेला नाही. आम्ही वेळोवेळी सहकार्य केले. पण कधी आम्हाला चुकीचा युटीआर क्रमांक देऊन तर कधी चेक रोखून धरत क्रिअर्जने आमची अडवणूक केली. पेमेंटचं नाही तर क्रिअर्जने पोस्ट प्रॉडक्शनचे कामही रखडवले. चित्रपटाचे शूटींग वेळेत पूर्ण झाले होते. पण डिस्ट्रीब्युटन प्लान आणि थर्ड पार्टीसोबतच्या आर्थिक व्यवहाराबाबतही आम्हाला अंधारात ठेवले गेले, असे जे ए एंटरटेनमेंटने म्हटले आहे.अर्थात जे ए एंटरटेनमेंटचे हे आरोप क्रिअर्जने फेटाळून लावले आहेत. ‘परमाणु’ला होत असलेल्या विलंबासाठी जॉन हाच जबाबदार असल्याचा प्रतिआरोप क्रिअर्जने केला आहे. जॉन ठरल्यापेक्षा अधिक पैशाची मागणी करतोय. आधीच सगळे आर्थिक व्यवहार ठरले असताना अचानक नव्या मागण्या करणे, कुठल्याही व्यवहारात बसत नाही, असे क्रिअर्जने म्हटले आहे.ALSO READ : अखेर जॉन अब्राहमच्या ‘परमाणु’ला मिळाले मुहूर्त!!यापूर्वी ‘परमाणु’ची रिलीज डेट वारंवार पुढे ढकलण्यावरून जॉन नाराज असल्याची बातमी होती. सर्वप्रथम हा चित्रपट ८ डिसेंबर २०१७ रोजी ‘परमाणु’ रिलीज होणार होता. पण तेव्हा संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ची रिलीज डेट जवळ असल्याच्या कारणावरून ‘परमाणु’ला लांबणीवर टाकले गेले.   यानंतर या चित्रपटासाठी २३ फेबु्रवारी २०१८ ही तारीख निश्चित करण्यात आली.   पण राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ आणि सोनाक्षी सिन्हाचा ‘बूम बूम इन न्यूयॉर्क’ पुन्हा या चित्रपटाच्या मार्गात आला. यामुळे ‘परमाणु’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली. अखेर  ‘परमाणु’साठी ९ एप्रिलचा मुहूर्त ठरला होता. पण कदाचित आता हा मुहूर्तही टळेल, असे दिसतेय.