Join us  

मल्लिकावर पॅरिसमध्ये हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2016 2:34 PM

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिच्यावरील हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यासोबत देखील अशीच घटना घडल्याचे समोर ...

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिच्यावरील हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यासोबत देखील अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मल्लिकाच्या पॅरिस येथील अपार्टमेंटच्या बाहेर काही अज्ञात हल्लेखोरांनी मल्लिकावर अचानक हल्ला केला. अश्रुधुराचा वापर करीत त्यांनी मल्लिकाला मारहाण केली, तसेच तिच्याकडील मौल्यवान वस्तूही लंपास केल्या. मल्लिकावर हल्ला करण्याºया या हल्लेखोरांनी चेहºयावर मास्क लावले असल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. दरम्यान मल्लिकाने तातडीने याबाबतची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. मल्लिका कामानिमित्त घराबाहेर पडली होती, मात्र अचानकच काही हल्लेखोर मास्क घालून तिच्यासमोर आले. मल्लिकासोबत असलेल्या व्यक्तींवर अश्रुधुराचा वापर करून त्यांनी त्यांनाही मारहाण केली. तसेच मल्लिकाकडे असलेला ऐवजही लुटून नेला. सध्या पोलीस या प्रकारणाचा तपास करीत असून, हल्लेखोर कोण असावेत याचा अंदाज बांधत आहेत. परिसरातील असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली जात आहे. मात्र हल्लेखोरांनी मास्क घातलेले असल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हानात्मक झाले आहे. एक महिना अगोदरच किम कर्दाशिया हिच्यासोबत अशीच घटना घडली होती.