बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'फूल और काटें'. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होती. अजय देवगण, अमरिश पूरी, अरुणा इराणी, मधू या कलाकारांच्या सिनेमांत मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील अजय देवगण आणि अभिनेत्री मधूची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली होती. 'फूल और काटे'मधील गाणीही लोकप्रिय ठरली होती. आज या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अजय देवगणने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
'फूल और काटे' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानची आठवणही अजय देवगणने सांगितली आहे. या चित्रपटातील मेरे कॉलेज की एक लडकी हे गाणंही प्रचंड गाजलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तरुणाईच्या ओठांवर हेच गाणं असायचं. आजही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. विशेष म्हणजे तेव्हा परदेशातही या गाण्याची क्रेझ होती. या सिनेमाचा एक किस्सा अजय देवगणने मुलाखतीत सांगितला होता. सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.
"फूल और काटें सिनेमाचा जर्मनीतील शो हाऊसफूल झाला होता. चित्रपट सुरू झाल्यानंतर स्क्रिनच्या बाजूच्या दरवाजाने मी थिएटरमध्ये पहिल्या रांगेत जाऊन बसलो. जेव्हा चित्रपटातील कॉलेज की लडकी हे गाणं लागलं तेव्हा थिएटरमध्येच लोकांनी पैसे फेकले. माझ्या डोक्याला ते पैसे लागले. ते सगळे पैसे मी उचलले आणि त्याची फ्रेम केली. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता," असं अजय देवगण म्हणाला होता.
या चित्रपटामुळे अजय देवगणच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. सध्या अजय देवगण त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.