15 ऑगस्टला अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार बॉक्स ऑफिसवर सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:08 PM2018-08-03T17:08:08+5:302018-08-03T17:08:34+5:30
अक्षय कुमारचा 'गोल्ड' सिनेमा आणि जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते याच 15 ऑगस्टला रिलीज करण्यात येणार आहेत. दोनही सिनेमांचे विषय जरी वेगळे असले तरी दोघांमधील समान दुवा म्हणजे देशभक्ती.
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन दिवस नेहमीच बॉलिवूडसाठी लकी ठरतात. त्यामुळे मेकर्स सिनेमाच्या रिलीजसाठी याच दिवशीचा मुहूर्त शोधत असतात. अक्षय कुमारचा 'गोल्ड' सिनेमा आणि जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते याच 15 ऑगस्टला रिलीज करण्यात येणार आहेत. दोनही सिनेमांचे विषय जरी वेगळे असले तरी दोघांमधील समान दुवा म्हणजे देशभक्ती. दोनही सिनेमा देशभक्तीवर आधारित आहेत. रिमा कागती दिग्दर्शित गोल्डमधून मौनी रॉय सिल्वर स्क्रिनवर पदार्पण करतेय. अक्षय कुमारसोबतच यामध्ये कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत.
१९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. हीच कथा ‘गोल्ड’मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते.त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे.
जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते' या सिनेमाबदल बोलायचे झाले तर यात जॉन भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी तो एकटाच मैदानात उतरला आहे. या लढाईत जॉन अनेकांना संपवतो. खाकीच्या रक्षणासाठी खाकीच्याच विरोधात उभा राहतो. मनोज वाजपेयीची ही या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. भरपूर अॅक्शन आणि ड्रामा बघायला मिळणार आहे.