Join us

सैफला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाने अभिनेत्याकडे व्यक्त केली 'ही' इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:08 IST

सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचवणाऱ्या रिक्षाचालकाचं नाव भजन सिंह राणा असं आहे.

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारी रोजी त्याच्याच घरात जीवघेणा हल्ला झाला. रात्री २ वाजता घरात घुसलेल्या चोराने सैफवर चाकूने ६ वार केले. दरम्यान सैफला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी त्याला कारने नाही तर रिक्षाने नेण्यात आले. सैफने नुकतीच डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या रिक्षावाल्याची भेट घेतली. त्यांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे  रिक्षा ड्रायव्हरने सैफकडे एक विशेष इच्छा व्यक्त केली आहे.

सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचवणाऱ्या रिक्षाचालकाचं नाव भजन सिंह राणा असं आहे. सैफला रुग्णालयात नेल्यानंतर त्याने तेव्हा पैसेही घेतले नव्हते. माणूसकी म्हणून त्याने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेले असं तो म्हणाला. सैफने त्याला ५० हजार रुपये बक्षीस म्हणून दिल्याची चर्चा आहे. दरम्यान इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत भजन सिंह म्हणाले, "सैफने मला बक्षीस म्हणून नवीन रिक्षा दिली तर मी नक्की स्वीकार करेन. मी हे मागत नाही पण त्याची इच्छा असेल तर मी घेईन. मी लालची नाही. काहीतरी मिळावं म्हणून मी हे केलेलं नाही."

तर दुसरीकडे गायक मिका सिंहने भजन सिंह यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. तसंच यांना १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. याशिवाय सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीने भजन सिंह राणा यांचा सम्मान केला आणि ११ हजार रुपये रोख बक्षीस म्हणून दिले.

टॅग्स :सैफ अली खान ऑटो रिक्षाबॉलिवूडमुंबई