Join us  

कमाल! योगायोगानं अभिनय क्षेत्रात आली ही चिमुरडी, वयाच्या २०व्या वर्षी घेतली चक्क रेंज रोव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 4:35 PM

Guess the Celeb Name: इन्स्टाग्रामवर फक्त 20 वर्षांच्या वयात तिचे 28 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Guess the Celeb Name: फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी लहानपणापासूनच चर्चेत आहे. सध्या त्याचे वय अर्थातच 20 वर्षे आहे, पण टीव्हीपासून बॉलिवूड (Bollywood)आणि सोशल मीडिया(Social Media)पर्यंत तिचा डंका आहे. इन्स्टाग्रामवर फक्त 20 वर्षांच्या वयात तिचे 28 मिलियन फॉलोवर्स आहेत. ऐवढंच नाही तर तिने आपल्या कमाईने रेंज रोव्हर (Range Rover) कार खरेदी केली आहे.  या मुलीने आपल्या मेहनतीने ही आलिशान कार खरेदी केली आहे. लवकरच ही मुलगी तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. अजूनपर्यंत तुम्हाला या मुलीचं नाव कळले नाही. मग आम्ही सांगतो..

फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून टिक-टॉक क्वीन आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली अवनीत कौर. होय, अवनीत लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawazuddin Siddiqui)सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अवनीत नेहमीच सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसतो.

विशेष म्हणजे अवनीत पहिला सिनेमा  OTT स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या कलाकारासोबत आहे. याआधीही अवनीत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे, पण मुख्य अभिनेत्री म्हणून तिची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. टिकू वेड्स शेरू असे तिच्या पहिल्या सिनेमाचे नाव आहे. अवनीत या चित्रपटात टिकूच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अवनीत कौर अनेक दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये चर्चेत आहे. 2010 मध्ये अवनीतने 'डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर' या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, पण नशिबाने तिला या फिल्मी दुनियेत आणले. त्याला 2011 मध्ये मेरी मां या मालिकेची ऑफर आली होती. मात्र तिला सर्वाधिक ओळख चंद्र नंदिनी आणि अलादीन या मालिकेतून मिळाली.

टॅग्स :टिव्ही कलाकारनवाझुद्दीन सिद्दीकी