बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने हिंदी चित्रपटसृष्टीत असे सिनेमे दिले आहेत जे मैलाचा दगड ठरलेत. त्यातीलच एक चित्रपट आहे ब्लॅक. ब्लॅक चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अमिताभ बच्चन व राणी मुखर्जी यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्क्रात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याशिवाय या चित्रपटातील आणखीन एका व्यक्तीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या अभिनेत्रीचं नाव आहे आयशा कपूर. आयशाने ब्लॅक चित्रपटात राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका केली होती. या चित्रपटाला १४ वर्षांचा काळ गेला असून आयशामध्ये खूप मोठा बदल झालेला पहायला मिळतो आहे.
आयशा कपूरने ज्यावेळी ब्लॅक चित्रपटात काम केलं होतं. त्यावेळी ती फक्त १० वर्षांची होती. आता ती २४ वर्षांची आहे. आयशा आता मोठी झाली असून तिच्या लूकमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. ब्लॅक चित्रपटानंतर ती सिकंदर चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता.
आयशाची आई जर्मनला स्थायिक असून तिच्या वडिलांचा लेदर बॅग्सचा इंटरनॅशनल ब्रॅण्ड आहे.