Join us

"लोकांना वाटायचं मी शोएबशी लग्न केलंय", क्रिकेटपटूसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर आयेशा ओमरने मौन सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 2:41 PM

शोएबसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर आयेशा ओमर पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, "माझ्या नातेवाईकांना..."

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी निकाह करत तिसऱ्यांदा संसार थाटला. काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाने त्याला खुला दिल्याचं समोर आलं. सनाशी लग्न करण्याआधी शोएबचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरबरोबर जोडलं गेलं होतं. आयेशा आणि शोएबने एका मॅगजीनसाठी फोटोशूट केलं होतं. तेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता शोएबने तिसरं लग्न केल्यानंतर आयेशाने त्यांच्या अफेअरच्या चर्चांबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. 

आयेशाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शोएबबरोबरच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं. तो काळ एका वाईट स्वप्नासारखा होता, असं आयेशा म्हणाली. "माझं केवळ नावच शोएबबरोबर जोडलं गेलं नव्हतं. तर त्याच्याबरोबर लग्न केल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. माझ्या काही नातेवाईकांनाही मी शोएबरोबर सिक्रेट लग्न केल्याचं वाटत होतं. हे सगळं ऐकून मला पॅनिक अटॅकही यायचे," असं आयेशाने सांगितलं. 

आयेशा आणि शोएबच्या मॅगजीन फोटोशूटनंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यांचे इंटिमेट फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच शोएब आणि सानियामध्ये बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, एका फॅमिली शोमध्ये सानिया आणि शोएबने एकत्र हजेरी लावत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर शोएबने सनासोबत लग्न केल्याचं सांगत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

शोएब आणि सनाचं गेल्या काही वर्षांपासून अफेअर असल्याचं समोर आलं आहे. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळूनच सानियाने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा त्याच्या बहिणीने केला आहे. शोएब आणि सानियाने २०१०मध्ये निकाह केला होता. त्यांना एक मुलगाही आहे. 

टॅग्स :शोएब मलिकसानिया मिर्झासेलिब्रिटीऑफ द फिल्ड