बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया आज (१० एप्रिल) आपला ३३ वा वाढदिवस साजरा करतेय. १० एप्रिल १९८६ रोजी मुंबईत आयशाचा जन्म झाला. आयशाचे वडील गुजराती तर आई ब्रिटीश आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आली तेव्हा आयशाला हिंदीचा एकही शब्द बोलता येत नव्हता. पण अॅक्टिंग करिअरसाठी आयशा मोठ्या जिद्दीने हिंदी व तेलगू भाषा शिकली. पुढे सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने आयशाला मोठी ओळख दिली. पण आताश: ‘वॉन्टेड’या आयशाला ओळखणेही कठीण झाले आहे. लिप सर्जरीने तिचा चेहरा असा काही बिघडला की, स्वत: आयशालाही पश्चाताप व्हावा...
आयशाने अधिक सुंदर दिसण्याच्या नादात लिप सर्जरी, आयब्रो व फोरहेड सर्जरी केली. या सर्जरीनंतरच्या नव्या लूकचे फोटो समोर आलेत. तिचे हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला. चाहत्यांना तिचा हा लूक जराही आवडला नाही. अनेकांनी यावरून तिला ट्रोलही केले. अर्थात सर्जरी केल्याचे आयशा नाकारत राहिली. पण तिच्या फोटोंनी सगळे काही स्पष्ट केले.
वयाच्या चौथ्या वर्षी आयशाने मॉडेलिंग सुरु केले. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चूर उड उड जाऐ’ या म्युझिक अल्बममध्ये ती झळकली. या अल्बममुळे आयशा अचानक प्रकाशझोतात आली.
२००४ मध्ये प्रदर्शित ‘टार्जन- द वंडर कार’ या चित्रपटातून आयशाने बॉलिवूड डेब्यू केला. पण तिला खरी ओळख दिली ती सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने. यानंतर दिल मांगे मोर, शादी नंबर १, कॅश, पाठशाला, दे ताली अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
फिल्मी करिअर उतरतीला लागल्यावर आयशाने लग्नाचा निर्णय घेतला. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहानसोबत तिने लग्नगाठ बांधली.