अभिनेता आयुष्यमान खुरानाला आज कोणत्याच परिचयाची गरज नाही आहे. आज आयुष्यमान त्याचा ३८वा वाढदिवस साजरा करतो आहे. आयुष्मान हा बॉलिवूडमधील बहुप्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयासोबतच आयुष्मानने आपल्या गाण्यानं आणि लेखनानेही चाहत्यांना आकर्षित केले आहे. आयुष्मान प्रत्येक भूमिकेत फिट बसतो. आयुष्माननं वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी लाइमलाईटमध्ये आला जेव्हा त्याने एका चॅनलच्या रिअॅलिटी शो 'पॉपस्टार'मध्ये सर्वात तरुण स्पर्धक म्हणून भाग घेतला. आयुष्मान वाढदिवशी जाणून घेऊया अभिनेत्या संबंधित काही खास गोष्टी.
आजपर्यंत आयुष्यमानने केलेल सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. त्याने केलेल्या सिनेमांना आता 'आयुष्यमान खुरानाचा जॉनर' म्हणून ओळखले जाते. आयुष्यमानकडे आज कामाची कमतरता नाही. आज एका सिनेमासाठी तो १० कोटीं चार्ज करतो.
आयुष्यमान हा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुष्यमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता.
आयुष्यमानने त्याच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा मुलाखती दरम्यान शेअर केले होता. आयुष्यमान म्हणाला, मी दिल्लीत शिक्षण पूर्ण झाल्यावर रेडिओ जॉकीचे काम करत होता. तेव्हा एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा मला फोन आला आणि त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी मला मुंबईला जायला सांगितले. हे ऐकून माझं सहकारी हैराण झाले की इकडे सगळं काही ठिक चालू असताना अचनाक मुंबईला का जायचंय. मात्र मी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुंबईत निघून आलो आणि त्यादिवसानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आयुष्मानचे वडील एक प्रसिद्ध ज्योतिषार्चाय आहेत.