१९९७ साली 'बॉर्डर' (Border) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर सनी देओल(Sunny Deol)ने यावर्षी 'बॉर्डर २'(Border 2)ची घोषणा केली. अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर'च्या सीक्वलमध्ये आयुषमान खुराणा (Ayushman Khurana) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता या अभिनेत्याने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. यामागचे कारणदेखील समोर आले आहे.
'मिड डे'च्या रिपोर्टनुसार, एका सूत्राच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, महिन्यांच्या चर्चांनंतर, आयुषमानने 'बॉर्डर २' सोडला आहे कारण तो या चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेबद्दल संभ्रमात होता. सूत्रांनी सांगितले की, 'सैनिकाची भूमिका साकारण्यासाठी टीम आयुषमानशी बरेच दिवस चर्चा करत होती. निर्माते आणि आयुषमान खुराणा दोघेही सहकार्य करण्यास तयार होते. पण सनी देओलसारख्या मोठ्या स्टारसमोर त्याच्या भूमिकेबाबत तो संभ्रमात होता. यावरून असे दिसते की, कदाचित सनी देओलला ज्या पद्धतीने चित्रपटात दाखवले जात आहे, तितके महत्त्वाचे आयुषमानचे पात्र नसेल. या कारणास्तव त्याने ते सोडण्याचा निर्णय घेतला असेल. मात्र अद्याप या वृत्ताला अभिनेत्याकडून दुजोरा मिळालेला नाही.
'बॉर्डर २'मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री?या चित्रपटात दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा अलिकडेच पसरली होती. मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. निर्मात्यांनी अभिनेत्याशी संपर्क साधला असला तरी अद्याप काहीही पुष्टी झालेली नाही. हा चित्रपट नोव्हेंबरपर्यंत फ्लोअरवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाला २७ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सनी देओलने सीक्वल आणून चाहत्यांना चकित केले.
'बॉर्डर २'ची स्टारकास्ट येणार समोरबिनॉय गांधी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'बॉलिवूड हंगामा'शी खास बातचीत करताना त्यांनी सांगितले की, 'बॉर्डर २' खूप छान बनवला जात आहे. त्याची पत्नी निधी गट्टा हिने त्याची स्क्रिप्ट लिहिली आहे. नोव्हेंबर महिन्यात त्याचे शूटिंग सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्याआधी, एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल ज्यामध्ये प्रत्येकाला संपूर्ण स्टार कास्टची ओळख करून दिली जाईल. 'एका महिन्याच्या आत आम्ही संपूर्ण स्टार कास्ट त्यांच्या पात्रांसह आणि त्यांच्या गेटअपसह दाखवणार आहोत.', असेही त्यांनी सांगितले.
आयुषमानने मेघना गुलजारचाही नाकारला सिनेमा'बॉर्डर २'पूर्वी आयुषमान खुराणाने मेघना गुलजारचा चित्रपट करण्यास नकार दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना कपूर हैदराबाद बलात्कार प्रकरणावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या सोबत आयुषमान दिसणार होता. पण मेघना गुलजारच्या चित्रपटाच्या तारखा आयुषमानच्या तारखांशी जुळत नव्हत्या. त्यामुळे त्याला तो सिनेमा सोडावा लागला. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पण दायरा हे शीर्षक तात्पुरते ठेवण्यात आले आहे.