Join us

आयुषमानने भावासोबत पंचकुलात खरेदी केले कोट्यवधींचे घर, किंमत ऐकून फुटेल तुम्हाला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 19:42 IST

आयुषमान आणि अपारशक्ती खुराणा दोघेही कुटुंबासह नव्या घरात शिफ्ट झाले आहेत.

लॉकडाऊन संपताच आयुषमान खुराना आपल्या परिवारासह चंदीगढला आला आहे.आयुष्मान खुराना व त्याचा भाऊ अपशक्ती खुराणाने होमटाऊन चंदीगढच्या जवळच एक घर घेतले आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार, असं म्हटलं जात आहे की दोघेही कुटुंबासमवेत तिथेच शिफ्ट झाले आहेत.

आयुषमानचे हे घर चंदीगडजवळील पंचकुला येथे आहे. रिपोर्टनुसार या घराची किंमत 9 कोटी आहे. आयुष्मानने आयएएनएसशी घराविषयी बोलताना सांगितले, ''खुरानास एक नवीन घर मिळाले आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र राहण्याचे ठरवले होते आणि मग आम्ही एक घर विकत घेतले. या घराला आम्ही आपल्या आठवणी सजवू आणि त्यास अधिक सुंदर बनवू.''

रिपोर्टनुसार, 6 जुलै रोजी आयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप पंचकुला तहसील कार्यालयात दिसले होते. तिथं त्यांनी घर नावावर केले. आयुष्मानचे नवे घर पंचकुलाच्या सेक्टर 6 मध्ये असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना व्हायरस दरम्यान, लॉकडाऊन आयुषमान स्वत: ला फिट ठेवण्यासाठी सायकल चालवित आहे. याचा फोटो आयुषमानने सोशल मीडियावर शेअर केला होता. आयुष्मान चंदीगडमध्ये सायकलिंग करुन  स्वत: ला फिट ठेवत आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणा