Join us

आयुष्मान खुराना किडनॅप? लाल Omni मधून आले, चाकूचा धाक दाखवला अन्...Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:45 IST

अभिनेता आयुष्मान खुरानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आयुष्मानला चक्क काही लोक किडनॅप करताना दिसत आहेत. चाकूचा धाक दाखवल्याने तोही शांतपणे कारमध्ये बसतो. आजूबाजूचे लोकही फक्त पाहतच राहतात. आता हा व्हिडिओ खरा की प्रमोशनल स्टंट आहे हे तर लवकरच कळेल. या व्हिडिओवर कमेंट्स करत सर्वांनीच हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

पापाराझींच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आयुष्मान खुराना आपल्या व्हॅनिटीमधून बाहेर पडतो. त्याचं मोबाईलमध्ये लक्ष असतं. समोरुन लाल रंगाची एक Omni येते. कारमधून काही धडधाकट लोक बाहेर पडतात. त्यातील एकाकडे चाकू असतो. त्याचा धाक दाखवत आयुष्मान खुरानाला ते कारमध्ये बसवतात. 

आता आयुष्मानच्या कोणत्या सिनेमासाठी हा पब्लिसिटी स्टंट आहे की तो कोणत्या शोमध्ये येतोय हे समजलेलं नाही. नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 'इतकं प्रेमाने अपहरण कोण करतं' अशी कमेंट एकाने केली आहे. 

आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. यानंतर त्याच्या कोणत्याच सिनेमाची अद्याप घोषणा झालेली नाही. सध्या त्याचं करिअर डगमगताना दिसत आहे आणि मोठ्या हिट सिनेमाची त्याला अपेक्षा आहे.  दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ एखाद्या जाहिरात कॅम्पेनचाही असू शकतो अशी चर्चा आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणाबॉलिवूडअपहरणसोशल मीडिया