बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि इरफान खान गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. आता बॉलिवूडला पुन्हा एक धक्का बसला आहे. होय, बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप हिलादेखील कॅन्सरचे निदान झाले. ताहिराला कॅन्सरचे निदान झाल्याची बातमी समोर येताच, बॉलिवूड पुन्हा एकदा हादरले.ताहिराने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आपल्या आजाराची माहिती दिली. स्टेज ० ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.
आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.