Join us

आयुषमान खुराणाला कास्टिंग काऊचचा आला होता धक्कादायक अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:34 PM

विकी डोनर या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये स्थिरावलेल्या आयुषमान खुराणाने नुकतेच कास्टिंग काऊचविषयी एक वक्तव्य केले आहे. फिट अप विथ द स्टार या चॅट शो मध्ये त्याने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी बॉलिवूडमध्ये तुला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेले उत्तर हे धक्कादायक होते.

बॉलिवूडमधील कलाकारांनी कास्टिंग काऊचबद्दल बोलणे आता नवीन राहिलेले नाही. विकी डोनर या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये स्थिरावलेल्या आयुषमान खुराणाने नुकतेच कास्टिंग काऊचविषयी एक वक्तव्य केले आहे. फिट अप विथ द स्टार या चॅट शो मध्ये त्याने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी बॉलिवूडमध्ये तुला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेले उत्तर हे धक्कादायक होते.

आयुषमान खुराणाने या शोमध्ये सांगितले की, माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी एका ऑडिशनला गेलो होतो. त्यावेळी ऑडिशनच्या वेळी एक धक्कादायक अनुभव आला होता. एका दिग्दर्शकाने मला काही दृश्य करून दाखवायला सांगितले होते. मी अभिनय करत असताना त्या दिग्दर्शकाने मला माझ्या पँटची चैन उघडायला सांगितली होती. त्या दिग्दर्शकाची ही मागणी ऐकून मला चांगलाच धक्का बसला होता. सुरुवातीला तर दिग्दर्शकाचे हे बोलणे ऐकून रडू की हसू हेच कळत नव्हते. मी हसतच तू काय बोलतोय तुला कळतंय का असे त्याला विचारले होते. मी असे कधीच करणार नाही असे मी त्याला तेव्हाच सांगितले होते. त्यावर तू असे केलेस तर तुला अधिक भूमिका मिळतील असे त्याने मला लेक्चर देखील दिले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हा अनुभव खूपच विचित्र होता. 

आयुष्यमान खुराणा आजघडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. त्याच्याकडे आज कामाची कमतरता नाही. ‘विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल सावधान’पर्यंत त्याच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले. आयुष्यमान हा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुष्यमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता. २०१२ मध्ये त्याचे नशिब फळफळले आणि त्याला ‘विकी डोनर’ मिळाला. ‘विकी डोनर’नंतर आयुष्यमानच्या करिअरची गाडी रूळावर धावू लागली. यानंतर ‘नौटंकीसाला’, ‘बेवकूफियां’, ‘हवाईजादा’ हे चित्रपट त्याने केलेत. पण हे चित्रपट दणकून आपटले आणि आयुष्यमानच्या करिअरला करकचून ब्रेक लागला. पुढे करिअरची गाडी पुन्हा सुरू होण्यासाठी त्याला २०१५ ची प्रतीक्षा करावी लागली. यावर्षी ‘दम लगा के हईशा’ आला. चित्रपट हिट झाला आणि आयुष्यमानच्या करिअरची गाडी सूसाट पळत सुटली.

टॅग्स :आयुषमान खुराणा