Join us

'बागी ३'मध्ये ८०च्या दशकातील हे लोकप्रिय गाणं केलं रिक्रिएट, टायगर - श्रद्धाचा टपोरी डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 12:41 IST

८०च्या दशकातील गाणे वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना बागी ३मध्ये पहायला मिळणार आहे

"दस बहाने 2.0" नंतर, बागी 3 मध्ये चित्रपट ८० च्या दशकातील चित्रपट तोहफा (1984) मधील आणखी एक चार्टबस्टर, "एक आंख मारू तो" गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. ज्याचे मूळ गाणे बप्पी लहरी यांनी रचले होते ज्याला किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी आवाज दिला होता, ज्यावर आता २०२० च्या नव्या व्हर्जन भंकसवर टाइगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे एका लग्नात टपोरी डांस करताना दिसणार आहेत. या गाण्याचे ३०० बैकग्राउंड डांसर्ससोबत मुंबईमध्ये एका सेटवर तीन दिवस शूट करण्यात आले आहे. 

बागी ३ मधील भंकस या गाण्याला तनिष्क बागची द्वारा रिक्रिएट करण्यात आले असून त्याला बप्पी लहरी, देव नेगी आणि जोनिता गांधी यांनी आपला आवाज दिला आहे.

"पस्तीस वर्षांपूर्वी, मी जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्यासाठी 'एक आंख मारू तो' ची रचना केली होती ज्याला लोकांनी खूप पसंत केले होते." बप्पीदांनी या आठवणींना उजाला देताना म्हटले 'आंख मारना'  हा शब्द प्रयोग पहिल्यांदाच एखाद्या गाण्यात वापरण्यात येत होता. “इंदीवर यांनी तो खूप सुंदरतेने या गाण्यात रचला आहे. या आइकॉनिक ट्रॅकला या चित्रपटात पुन्हा एकदा वापरण्याची कल्पना निर्माता साजिद नाडियादवाला यांची होती.

अहमद खान द्वारा दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला द्वारा निर्मित, बागी 3 येत्या 6 मार्चला प्रदर्शित होत आहे. 

टॅग्स :बागी ३टायगर श्रॉफश्रद्धा कपूररितेश देशमुखअंकिता लोखंडे