Join us

Baaghi 3 Movie : 'बागी ३'मधील 'दस बहाने 2.0' गाणं झाले रिलीज, सिझलिंग अंदाजात दिसले टायगर-श्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 17:09 IST

Baaghi 3 Movie : 'बागी ३'मधील दस बहाने 2.0 गाण्याला अल्पावधीतच मिळतोय चांगला प्रतिसाद

बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट 'बागी ३' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला केवळ ७२ तासांमध्ये १०० मिलियनहुन जास्त व्ह्युज आहेत.टायगर व श्रद्धाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. त्यात आता या चित्रपटातील दस बहाने २.० हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात श्रद्धा व टायगरची सिझलिंग केमिस्ट्री पहायला मिळते आहे.

"दस बहाने" एक ग्लॅमरस डांस नंबर आहे, जे मूलत: संगीतकार विशाल आणि शेखर द्वारा रचित आहे आणि त्याच जोडीने ते आता बागी ३ साठी रिक्रिएट केले आहे. गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन अधिक सुंदर असेल कारण ते मुंबई, राजस्थान आणि सर्बिया च्या नयन सुंदर लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे. 

बागी 3 बाबत बोलायचे झाल्यास, फिल्म अहमद खान द्वारा निर्देशित असून त्यात श्रद्धा कपूर, अंकिता लोखंडे आणि रितेश देशमुख यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

२०१६ मध्ये रिलीज झालेली सुपरहिट बागी नंतर श्रद्धा दुसऱ्यांदा टायगरसोबत दिसणार आहे. साजिद नाडियादवाला द्वारा निर्मित बागी ३ या वर्षी ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :टायगर श्रॉफश्रद्धा कपूरबागी ३