Join us

Baahubali - 2 : ‘साहोरे बाहुबली’ गाण्यात राजा अमरेंद्र बाहुबलीचा पहा रुबाब!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2017 7:28 AM

शनिवारी सायंकाळी चित्रपटातील ‘साहोरे बाहुबली’ या गाण्याचा व्हिडिओ प्रोमो रिलीज करण्यात आला असून, इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल होत आहे.

लवकरच रिलीज होणारा बहुचर्चित ‘बाहुबली-२’ या चित्रपटाची चर्चा सध्या सर्वदूर आहे. दररोज या चित्रपटाबाबत एकतरी बातमी समोर येत असल्याने प्रेक्षकांना चित्रपटाविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी चित्रपटातील ‘साहोरे बाहुबली’ या गाण्याचा व्हिडिओ प्रोमो रिलीज करण्यात आला असून, इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्याचबरोबर प्रोमो बघून चित्रपटाविषयीची उत्सुकताही वाढली आहे. पुढच्या आठवड्यात रिलीज होणाºया या चित्रपटाचा थरार काय असू शकतो याचा अंदाज गाण्याच्या प्रोमोवरून बांधणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांची आतुरता जबरदस्त ताणली जात आहे. या गाण्याच्या प्रोमोमध्ये चित्रपटातील मुख्य पात्र अमरेंद्र बाहुबली याला एक राजाच्या रूपात इंस्ट्रोड्यूस करण्यात आले आहे. एका राजात आणि त्याच्या प्रजेत कशाप्रकारचे संबंध असतात, हेच यातून दाखविण्यात आले आहे.हे गाण्याला साउथचे प्रसिद्ध गायक एम. एम. किरावानी आणि मौनिमा यांच्यासह पंजाबी फोक गायक दिलेर मेहंदी यांनी आवाज दिला आहे. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटात आणखी एका नव्या पात्राची एंट्री होण्याची शक्यता आहे. चित्रपटात प्रभास ट्रिपल रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना खूप भावला होता. ‘बाहुबली : द बिगनिंग’मध्ये बाहुबलीची अर्धवट कथा दाखविण्यात आली होती. आता या दुसºया भागात पूर्ण कथा दाखविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटांचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला होता. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा आहे. कारण ‘कटप्पाने बाहुबली को क्यो मारा’ या प्रश्नांचे त्यांना उत्तर मिळवायचे आहे. दरम्यान, या चित्रपटाचे मुंबई येथे ग्रॅण्ड प्रीमियरचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याकरिता जोरदारपणे तयारी सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी केले असून, प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.