‘बाहुबली’ चित्रपटात भल्लालदेवच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता राणा दग्गुबाती मध्यंतरी त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आला होता. होय, राणाची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आल्याचे वृत्त ऐकून चाहत्यांना धडकी भरली होती. राणा दग्गुबातीची आई लक्ष्मीने तिची किडनी त्याला दिल्याचेही या वृत्तात म्हटले होते. पण कालांतराने हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. आता हाच राणा त्याच्या शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे.
‘बाहुबली’ सिनेमातील राणाचे पिळदार शरीर आणि दमदार पर्सनॅलिटी पाहून सगळेजण त्याच्या प्रेमात पडले होते. हे शरीर कमवण्यासाठी राणाने जिममध्ये बराच घाम गाळला होता. पण आता मात्र तो याच्या बरोबर उलट दिसत आहे.
होय, याचे कारण म्हणजे राणा दग्गुबातीने तब्बल 30 किलो वजन कमी केले आहे. त्याचा आगामी सिनेमा ‘हाथी मेरे साथी’साठी त्याने वजन कमी केले. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत जे पाहून सगळेच थक्क झालेत.
35 वर्षीय राणा दग्गुबाती ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमात एका सामान्य जंगलात राहणा-या माणसाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत फिट बसण्यासाठी राणाला त्याचे वजन कमी करावे लागले. यासाठी त्याने 30 किलो वजन कमी केले. यासाठी स्ट्रिक्ट डाएट प्लान फॉलो केला तसेच टफ ट्रेनिंग घेतले. आहारातून प्रोटीन आणि मीठ सुद्धा कमी केले.
राणा दग्गुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ हा सिनेमा येत्या 2 एप्रिलला रिलीज होणार आहे. हा सिनेमा जंगल, जंगलातील प्राणी आणि तिथे राहणारा एक माणूस यांच्यावर आधारित आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.